घरताज्या घडामोडीज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायला कुठून शिकलात? आव्हाडांचा केसरकरांना परखड सवाल

ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायला कुठून शिकलात? आव्हाडांचा केसरकरांना परखड सवाल

Subscribe

ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात, असा परखड सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे.

जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, त्यामागे शरद पवारांचाच हात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शरद पवार यांनी त्यांना यातना का दिल्या हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी आज सकाळी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेद्र आव्हाड यांनी केसरकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात, असा परखड सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे. (Jitendra Awad tweet for deepak kesarkar controversy)

हेही वाचावारंवार शिवसेना फोडून बाळासाहेबांना यातना का दिल्या, केसरकरांचा शरद पवारांना सवाल

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून केसरकारंवर टीका केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, अहो केसरकर किती बोलता पवारसाहेबांविरुद्ध? एकेकाळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? २०१४ ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका.

हेही वाचा – नारायण राणेंच्या बंडाला शरद पवारांची फूस, दीपक केसरकरांचा दावा

- Advertisement -

विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मी मदत केली असली तरी, त्यांनी कोणत्या पक्षात जावे, ही अट मी घातलेली नाही, असे खुद्द शरद पवार यांनीच मला सांगितले होते, असा दावाही केसरकर यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरे यांच्याबाबतीतही तेच झाले. राज ठाकरे यांना शरद पवारांचे आशीर्वाद होतेच. राज ठाकरेही त्यांना मानतात. इतर फुटीच्या वेळीही त्यावेळचे काँग्रेसचे नेते म्हणून ते होतेच, असा आरोप केसरकर यांनी केला होता.


दीपक केसरकर यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली आहे. “दीपक केसरकर कुठे तरी बोललेत राणेंची दोन्ही मुलं लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण युतीमध्ये आहोत. विसरू नका. जेवढी युती टिकवायची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढी तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदेंच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केलीय हे आम्हाला माहीत आहे, असं म्हणत नीलेश राणेंनीही दीपक केसरकरांवर हल्ला चढवलाय.

हेही वाचा – दीपक केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका, नाही तर…; राणेंच्या धमकीनंतर युतीत पडणार वादाची ठिणगी

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -