घरताज्या घडामोडीपतंजली उत्पादनं प्रमोट करणाऱ्यांनी 'हा' 10 वेळा विचार करावा, जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

पतंजली उत्पादनं प्रमोट करणाऱ्यांनी ‘हा’ 10 वेळा विचार करावा, जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

Subscribe

आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून उत्पादनं तयार करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली कंपनीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वकील शाशा जैन यांनी पतंजली कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावरून संताप व्यक्त करत बाबा रामदेव यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, पतंजली उत्पादनं प्रमोट करणाऱ्या लोकांनी 10 वेळा विचार करावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत रामदेव बाबांच्या पतंजली या प्रोडक्टवर टीका करत एकप्रकारे चांगला सल्ला दिला आहे. कोलगेट “आमच्या टूथ पेस्टमध्ये नमक आहे”, अस स्पष्ट सांगून आपले उत्पादन विकते. बाबा रामदेव यांची पतंजली मात्र,”आमची टूथपेस्ट शाकाहारी आहे” असे सांगून, लोकांना “फिश बोन” (माशांची हाडे) युक्त मासांहारी टूथपेस्ट विकत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

हा बाबा रामदेववर विश्वास ठेवणाऱ्या करोडो लोकांचा विश्वासघात आहे. त्यांनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेवून, शाकाहारी लोकांना मासांहरी उत्पादने विकली आहेत. पतंजली उत्पादने प्रमोट करणाऱ्या लोकांनी देखील 10 वेळा विचार करावा की,आपण आपले खिसे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून तर भरत नाही आहोत ना, असंही आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

पतंजलीच्या दंत कांती टूथपेस्टमध्ये कटलफिश या माशाची हाडं आणि मांस वापरण्यात आल्याचा दावा वकील शाशा जैन यांनी केला आहे. त्यांनी पतंजली कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितलं आहे. पतंजलीचं स्पष्टीकरण येईपर्यंत मला कंपनीच्या उत्पादनांबाबत संशय आहे. जैन यांनी कंपनीला पाठवलेल्या नोटीशीला १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.

शाशा जैन यांनी आरोप करत कायदेशीर नोटीस ट्वीटरवर पोस्ट केली आहे. पतंजलीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनात दिव्या दंत मंजनच्या सी फेनच्या वापराबद्दल उत्तर मागितले आहे. कंपनी हे उत्पादन ग्रीन लेबलसह विकते. हे ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे.

जेव्हा कंपनी आपले उत्पादन शाकाहारी उत्पादन म्हणून बाजारात आणते, तेव्हा त्यामध्ये मांसाहारी वस्तू वापरणे हे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच उत्पादन लेबलिंग कायद्याचे उल्लंघन आहे, असं शाशा जैन यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुंबईत चार फ्लॅट, महागडी घड्याळं… एवढी संपत्ती असलेल्या समीर वानखेडेंच्या आर्यन प्रकरणात नवा ट्विस्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -