घरताज्या घडामोडीतुम्ही व्यक्तिगत माणसाच्या घरावर का जात आहात?, जितेंद्र आव्हाडांचा सवाल

तुम्ही व्यक्तिगत माणसाच्या घरावर का जात आहात?, जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Subscribe

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या मूक आंदोलनाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात मूक आंदोलनाला सुरूवात केली आहे. एसटी कर्मचारी हे एक संघटनांमध्ये विभागले नसून ते अनेक संघटनांमध्ये विभागले आहेत. मात्र, या तिन्ही संघटनांकडून निषेध करण्यात आलाय. याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. काल जी घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी घडली. अशा प्रकारची घटना लोकशाहीमध्ये कधी घडलेली नाही. तसेच तुम्ही व्यक्तिगत माणसाच्या घरावर का जात आहात, हे सरकार असून सरकारच्या विरोधात तुमची भूमिका असणं गरजेचं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हे एखाद्या माणसाला टार्गेट करत वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्दा त्यांना टार्गेट करावसं का वाटतंय?, अमरावतींच्या नेत्यांना फ्रेंचमधली राज्यक्रांती आठवली. अराजक पसरवण्याचं काम राज्यात सुरू आहे. अमरावतीच्या नेत्यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह आहे. महाराष्ट्राच्या जनतेला इतिहास काय आहे, हे माहिती नाही, असं तुम्हाला वाटतंय का?, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला.

- Advertisement -

व्यक्तीकेंद्रीत द्वेष किंवा राजकारण केलं जातंय?

ज्या प्रकारे अमरावतीतून हे नेते बोललेले आहेत. सध्या त्यांचा प्रवक्ता म्हणून जो कार्य करत आहे. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं अशोभनीय आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा धिक्कार केला पाहीजे. जेव्हा आपण जन्माला आलो नव्हतो. तेव्हापासून पवार साहेबांनी राजकारणाला सुरूवात केलीय. आजही महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या अवतीभवती फिरतं असतं. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी नवव्या की दहाव्या दिवशी नागपूरमध्ये ४४ अंश सेल्सिअस तापमानामध्ये पहिलं भाषण केलं.

काल झालेल्या शरद पवारांच्या भेटीत शरद पवार म्हणाले होते की, तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त करू नका असा सवाल पत्रकाराने विचारला असता, आव्हाड म्हणाले की, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की, नेता चुकला की दिशा चुकते. त्यामुळे यामध्ये त्यांचा काहीही दोष नाही.

- Advertisement -

हेही वाचा : ST Workers Strike : कालची घटना नियोजनबद्ध होती, गोपीचंद पडळकरांचा आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -