Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad : हा तमाम अस्पृश्यांच्या अस्मितेचा अपमान, आव्हाडांचा सातपुतेंवर निशाणा

Jitendra Awhad : हा तमाम अस्पृश्यांच्या अस्मितेचा अपमान, आव्हाडांचा सातपुतेंवर निशाणा

Subscribe

मुंबई : सोलापूर राखीव मतदारसंघात भाजपाचे आमदार राम सातपुते आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे अशी लढत होणार आहे. पण त्याआधी काल, सोमवारी त्यांच्यात पत्रयुद्ध झाले. धर्म आमि जातीपातीत फूट पाडण्यावरून दोघांमध्ये टोलेबाजी झाली. आता यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – LokSabha Election: ‘सामना’तून उद्धव गटाची पहिली यादी होणार जाहीर; कोण आहेत संभाव्य उमेदवार, पाहा

डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. मागच्याच वर्षी एका विषयावर मी भाषण करत असताना आमदार राम सातपुते यांनी मधेच उठून काही बोलायला सुरुवात केली. एक वाक्य माझ्या लक्षात आहे.की मी सनातन हिंदू मागासवर्गीय असल्याचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले होते. पण, या तरुणाची अस्पृश्यतेविषयी आणि त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे दिसले, असे डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे.

दुर्दैव हे आहे की, या तरुणाला भाजपाकडून सोलापूरमधून मागासवर्गीय म्हणून तिकीट देण्यात आले आहे. अस्पृश आणि त्याचा संघर्ष माहिती नसलेला उमेदवार देणे हा तमाम अस्पृश्यांच्या अस्मितेचा अपमान आहे, अशी टिप्पणीही राज्याचे माज मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

हेही वाचा – Politics: सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता…; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

प्रणिती शिंदेंकडून सातपतेंचे स्वागत

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी काल, सोमवारी सोशल मीडियावर पत्र शेअर केले होते. स्वत:ला सोलापुरची लेक म्हणत त्यांनी राम सातपुते यांचे स्वागत केले. तसेच, लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणे अपेक्षित असते. पुढील 40 दिवस याचे भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

राम सातपुतेंचे उत्तर

प्रणिती शिंदे यांच्या या पत्राला उत्तर दिले आहे. मी ज्या भाजपाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कोणी एवढी वर्षं राजकारण केले आहे, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेने आता ओळखले आहे, असे त्यांनी या पत्राद्वारे प्रणिती शिंदे यांना सुनावले आहे.

हेही वाचा – Mahayuti Seat Sharing : महायुतीत फक्त 2 जागांवर तिढा; पाहा कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला?