Homeमहाराष्ट्रSantosh Deshmukh Murder : एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांवर आव्हांडाचा सवाल, असले अधिकारी वाक्मीकला...

Santosh Deshmukh Murder : एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांवर आव्हांडाचा सवाल, असले अधिकारी वाक्मीकला…

Subscribe

संतोष देशमुख हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख याच्या हत्येप्रकरणी मास्टरमाईंड म्हटला जाणारा वाल्मीक कराड हा पोलिसांनी शरण आला आहे. तर या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे आणि त्या दोघांना मदत पुरविणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी शनिवारी पुण्यातून अटक केली असून त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आले. तर दुसरीकडे या प्रकरणी एसआयटीची स्थापनाही झाली आहे. परंतु एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. (Jitendra Awhad alleges that two officers in the SIT in the Santosh Deshmukh murder case have close ties with Dhananjay Munde)

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये पीएसआय महेश विघ्ने आणि मनोजकुमार वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांचे फोटो ट्वीट करत गंभीर आरोप केले आहेत. आव्हाड यांनी ट्वीट करताना म्हटले की, संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमला आहे. परंतु त्यांच्या हाताखाली दिलेले अधिकारी हे वाल्मीकच्या जवळचे पोलीस आहेत.

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांवर आव्हांडाचा सवाल, असले अधिकारी वाक्मीकला…

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पीएसआय महेश विघ्ने याचा धनंजय मुंडे हे निवडून आल्यावर त्यांच्यासोबतचा फोटो आहे. किती जवळचे आणि प्रेमाचे संबध आहेत दोघांमध्ये पाहा. हे असले अधिकारी वाल्मीक कराडला शिक्षा देतील की मदत करतील? महेश विघ्ने याने निवडणूक काळात धंनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आसल्याप्रमाणे काम केले आहे. तर दुसरा अधिकारी मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा त्यंत खास माणूस आहे. मनोजकुमार वाघ हा गेली 10 वर्षे बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय, असा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत…; बजरंग सोनवणेंचा इशारा