मुंबईत दिवाळीत निघणार म्हाडाच्या घरांची सोडत, जितेंद्र आव्हाडांची माहिती

सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 

Second and third phase of document verification for MHADA recruitment announced

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत दिवाळीमध्ये ३००० घरांची सोडत काढणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांना मुंबईत घर घेण्याच स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. मुंबईतील म्हाडाचे अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण होणार आहेत. लवकरच काम पूर्ण झाल्यास सोडत जाहीर करण्यात येईल असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पूर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रातील म्हाडा पुर्नविकासाला थोडीशी खिळ बसल्यासारखे झाले आहे. खोलात गेले असता त्याचे कारण प्रिमीअम आहे असे वाटते. पुर्नवसन इमारतींचा प्रिमीअम थोडासा कमी करुन ह्या पुर्नविकासाला परत गती देता येते का याची मी तपासणी करत असल्याची माहितीसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहे. म्हाडाच्या माध्यमातून अनेकांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होत असते. माफक दरात म्हाडा घरं उपलब्ध करुन देते. हजारो अर्जदारांचा म्हाडाच्या सोडतला प्रतिसाद असतो. दरम्यान यंदाच्या दिवाळीत हजारो नागरिकांना मुंबईत घरं घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.


हेही वाचा : MNS Raj Thackeray : भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र