अखेर ठरले, कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना १६ मे रोजी मिळणार घरं, शरद पवारांच्या हस्ते देणार चाव्या

टाटा मेमोरियल रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना म्हाडाचे १०० घरे

jitendra awhad announces rooms keys would be handed over by Sharad Pawar to tata memorial on 16 may 2021
अखेर ठरले, कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना १६ मे रोजी मिळणार घरं, शरद पवारांच्या हस्ते देणार चाव्या

टाटा मेमोरियल रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना म्हाडाचे १०० घरे देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. अखेर हे १०० घरे तयार झाली आहेत. आता येत्या रविवारी, १६ मे २०२१ रोजी म्हाडाच्या १०० घरांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालय हे कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नावाजलेले रुग्णालय असून या रुग्णालयात महाराष्ट्र तसेच देशातून रुग्ण येत असतात.

टाटा मेमोरियल रुग्णालयात राज्यातून आणि देशातून कॅन्सर ग्रस्त रुग्ण येत असतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही असतात. या नातेवाईकांना रुग्णालयात राहण्याची सोय नाही तसेच काही रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी निवासस्थान परवडत नाहीत यामुळे या नातेवाईकांवर मुंबईतील फुटपाथ, पुलाखाली राहण्याची वेळ येते. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासाठी राज्य सरकारने म्हाडांतर्गत १०० घरे देण्याची घोषणा केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत घोषणा केली होती.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ९ मे रोजी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सोमवारी त्यांनी या आठवड्यात कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरे मिळणार असल्याचे सांगितले होते. अखेर तो क्षण आला आहे. येत्या रविवारी १६ मे रोजी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १०० घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत. या चाव्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत.

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांच्या घरांचे काय झाले

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांच्या घरांचे काय झाले असा प्रश्न पवारांनी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं… मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत… मग म्हणाले उशीर कशाला… मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय… साहेब म्हणाले ठिक आहे…. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत. असा किस्सा आव्हाड यांनी सांगितला आहे.