कोरोनाला जगण्याचा अधिकार, भाजप माजी मुख्यमंत्र्यांवर आव्हाडांची शेलक्या शब्दात टीका

कुठून हे नग मिळतात?

jitendra awhad BJP criticizes former cm trivendra singh rawat on controversial statement
कोरोनाला जगण्याचा अधिकार, भाजप माजी मुख्यमंत्र्यांवर आव्हाडांची शेलक्या शब्दात टीका

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यसह देशपातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशामध्ये उत्तरा खंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अजब वक्तव्य केले आहे. कोरोना व्हायरल एक जीव आहे त्याला जगण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोजक्याच शब्दात टीका केली आहे.

उत्तरा खंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीकांना सामोरे जावे लागते. परंतु कोरोना महामारी घोषित केली असताना त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटले आहे की, कोरोना एक जीव आहे त्याला जगण्याचा अधिकार आहे. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांनी ट्विट करत रावत यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात? कोरोना सुद्धा जीव आहे त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे ….म्हणता आहेत #BJP चे उत्तराखंड चे माझी मुख्यमंत्री श्री रावत …. म्हणूंन त्यांच्या साठी माणसे मेली तर काय फरक पडतो अशा शेलक्या आणि मोजक्याच शब्दात आव्हाड यांनी टीका केली आहे. या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी त्रिवेंद्र सिंह रावत यांचा व्हिडिओही शेअर केला आहे.

काय म्हणाले त्रिवेंद्र सिंह रावत

दर्शनी पाहता कोरोना व्हायरसही एक जीव आहे. त्यामुळे इतर लोकांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु आपण मनुष्यप्राणी स्वत:ला जास्तच बुद्धीमान समजतोय आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हा कोरोना विषाणू स्वत:चे सतत रुप बदलत आहे. त्यामुळे मनुष्याला जर सुरक्षित राहायचे असेल तर त्याने विषाणूला मागे टाकण्याची गरज आहे. असे वादग्रस्त विधान त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे.