घरमहाराष्ट्रतो इस्रायली असल्याने...., काश्मीर फाईल्सवरून जितेंद्र आव्हाडांचा केंद्रावर निशाणा

तो इस्रायली असल्याने…., काश्मीर फाईल्सवरून जितेंद्र आव्हाडांचा केंद्रावर निशाणा

Subscribe

नदव लॅपिड यांचे या महोत्सवातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या चाहत्यांनी विवेक अग्निहोत्रींना ट्वीटरवर हा व्हिडीओ टॅग करत आपली प्रतिक्रिया देण्याची विनंती केली आहे.

मुंबई – २०२२ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला आणि तरीही सर्वाधिक बॉक्स ऑफिसवर कमाई केलेल्या दि काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटावर इस्त्रायल चित्रपट निर्माते नादव लॅपिड (Nadav lapid) यांनी टीका केली आहे. त्यावरून, राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारावर निशाणा साधला आहे. तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी काश्मीर फाईल्स चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा – ‘द काश्मीर फाईल्स’ व्हल्गर चित्रपट… IFFIच्या परीक्षकांची टीका

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी “काश्मीर फाईल्स” चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लापिडने सणसणीत चपराक लगावली.

- Advertisement -

IFFI च्या परिक्षकांचा ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा

सध्या गोव्यात सुरु असणारा ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ चांगलाच चर्चेत आहे. या महोत्सवात अनेक भारतीय दिग्गज कलाकारांनी भेट दिली होती. या महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांना प्रमुख परिक्षक म्हणून होते. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर चांगलाच निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या महोत्सवातील 15 वा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आम्ही खूप निराश आहोत. आम्हाला वाटते की हा चित्रपट एका विशिष्ट विचारांचा प्रचार करणारा आणि असभ्य आहे. एवढ्या मोठ्या महोत्सवात या चित्रपटाला स्थान मिळणं चूकीचं आहे.

नदव लॅपिड यांचे या महोत्सवातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या चाहत्यांनी विवेक अग्निहोत्रींना ट्वीटरवर हा व्हिडीओ टॅग करत आपली प्रतिक्रिया देण्याची विनंती केली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -