घरठाणेमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कळवा पुलाचं उद्घाटन करावं, जितेंद्र आव्हाडांची मागणी

मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कळवा पुलाचं उद्घाटन करावं, जितेंद्र आव्हाडांची मागणी

Subscribe

ठाण्यातील मोठ्या प्रकल्पांमधील एक प्रकल्प असलेला कळवा खाडीवरील तिसरा पूल हा चांगलाच चर्चेत आला आहे. जवळपास ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालेला हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला करणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. ठाणे महानगर पालिकेकडून हा पूल सुरु करण्यासाठी वारंवार मुदत देण्यात आल्या होत्या. मात्र आता सगळ्या डेडलाईन पार झाल्या आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर या पुलाचे उदघाटन करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मी या पुलाच्या उद्घाटनासाठी आलो नसून मुख्यमंत्री ठाण्यातील आहेत आणि ठाण्यातील मोठ्या पायाभूत सुविधांपैकी पहिला हा मोठा पूल आहे. या पुलासाठी सगळ्यांची मदत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या पुलाचे उद्घाटन करावं यासाठी येथे आलो असल्याचे आव्हाडांनी सांगितले.

- Advertisement -

ठाण्यातलं पहिलं मोठं उद्घाटन आहे. त्यामुळे उद्घाटनाचं क्रेडीट आम्हाला नको आहे. ते क्रेडीट मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच घ्या. परंतु या पुलाचं उद्घाटन करा. कारण ठाणे आणि कळव्यातील लोकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: शाळेत जाणाऱ्या मुलांना अर्धा ते एक तास उशीर होतो. त्यामुळे अर्धवट राहिलेली कामं कंत्राटदारांनी पूर्ण करावी, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

गरीब कंडक्टर महिलेचा व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून कंडक्टर महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात वर्ग संघर्षाचा वास येत असल्याचे आव्हाडांनी सांगितले. उच्चभ्रू सोसायटी किंवा उच्च पदिस्त अधिकाऱ्यांचे नाच-गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर येत असतात. त्यात त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत. एका गरीब कंडक्टर महिलेने एक व्हिडीओ टाकला तर तिला निलंबित केले हा कुठला न्याय. ही दुर्दैवी बाब असून त्या महिलेला त्वरित नोकरीवर रुजू करून घेण्यात यावं. नाहीतर आमच्या महिला पदाधिकारी महिलेसाठी पाठीशी उभ्या राहतील, असा इशारा आव्हाडांनी दिला आहे.

अनिल देशमुख यांना ११ महिन्यानंतर जामीन

अनिल देशमुख यांना ११ महिन्यानंतर जामीन मिळालं त्याचा मला आनंद होत असल्याचे आव्हाड म्हणाले. त्यांची निर्दोष मुक्तता होईल याबाबत देखील आम्हाला खात्री असून हा सत्याचा विजय असल्याचे आव्हाड म्हणाले.

या मेळाव्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही

स्वत:च्या ताकदीवर काही करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा याच्याशी काहीही संबंध नाही. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत असतो. त्यामुळे या मेळाव्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही, असं आव्हाड म्हणाले.


हेही वाचा : दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांची सज्जता, निवृत्त कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -