Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रJitendra Awhad : जिंकल्यानंतरही आव्हाडांना ईव्हीएमवर शंका; म्हणाले, मी जिंकलो कसा?

Jitendra Awhad : जिंकल्यानंतरही आव्हाडांना ईव्हीएमवर शंका; म्हणाले, मी जिंकलो कसा?

Subscribe

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठे यश मिळाले. तर, महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. या पराभवानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर खापर फोडण्यास सुरुवात केली. पण असे असतानादेखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रचंड मताधिक्क्याने पुन्हा एकदा आमदार झाले. पण असे असतानाही त्यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हंटले की, “1 ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात ईव्हीएम मशिनची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली होती. यावेळी माझी एक टीम 25 सहकाऱ्यांसोबत पहिल्या दिवसापासून सज्ज झाली. त्यांच्या सोबतीला वकिलांची एक टीम देखील कामाला लागली होती, असे आव्हाड म्हणाले. (Jitendra Awhad facebook post on evm controversy and his Maharahstra Election win)

हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : स्पष्ट आणि निर्विवाद बहुमत आवश्यक, पण…

- Advertisement -

माझ्या या टीमने यामध्ये पूर्ण गांभीर्याने लक्ष देत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली. ईव्हीएम मशीनबाबत पहिल्या टप्प्यातील तपासणी (FLC), रँडमायझेशन 1-2 आणि नंतर कमिशनिंगची प्रक्रिया जी पार पाडली जाते, त्यावर या टीमने लक्ष ठेवले. या लोकांनी निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला. चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या. अधिकाऱ्यांशी काहीवेळा वादही झाला, गोड बोलुनही कामे करून घेण्यात आली. हे करण्यामागे आमचे सर्व गोष्टींवर लक्ष असून याची जाणीव करून देण्याची रणनिती होती, असे आव्हाड म्हणाले. ईव्हीएमच्या वाहतुकीवरही आम्ही लक्ष ठेवले होते. जेव्हा ही ईव्हीएम एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात आली, तेव्हा त्या गाड्यांमागे आमची टीम जात होती. एक गाडी बिना पोलीस सुरक्षा घेत निघाली होती. ती देखील आम्ही पकडली होती, त्याचे ट्विटही केले होते, असे आव्हाड यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या सर्व प्रक्रिया आम्ही पार पाडल्या. त्यामुळे कोणत्या बुथवर कोणती मशीन जाणार याचे तपशील आमच्याकडे होते. यामुळे इतर कोणाच्या मशीन तिथे नेण्याची हिंमत होऊ शकली नाही. मतमोजणी वेळी देखील आमच्या एजंटना याची माहिती दिली गेली. त्यांचे प्रशिक्षण घेतले. यामुळे कोणताही धांदली माझ्या मतदारसंघात होऊ शकली नाही आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -