Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politic : मुख्यमंत्री ठरण्याआधीच घडामोडींना वेग? जितेंद्र आव्हाडांनी घेतली शिंदेंची भेट

Maharashtra Politic : मुख्यमंत्री ठरण्याआधीच घडामोडींना वेग? जितेंद्र आव्हाडांनी घेतली शिंदेंची भेट

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहचले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? किंवा भेटीचे कारण काय होते? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राज्यात महायुती मोठ्या मताधिक्काने विजयी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अद्याप महायुतीकडून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरताना दिसत नाहीय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहचले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? किंवा भेटीचे कारण काय होते? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. (Jitendra Awhad met Eknath Shinde even before the formation of the Mahayuti government in the state)

महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री आणि खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे, मात्र अद्याप भाजपाकडून या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याने महायुतीची आजची बैठक रद्द करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी जाण्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – New Government : सत्तास्थापनेस का होतोय उशीर? जाणून घ्या कारणं…

दरम्यान, याआधी जितेंद्र आव्हाड यांनी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्यालाही गृहमंत्रीपदाशिवाय इतर महत्त्वाची खाती येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा होताना दिसत आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार महायुतीसोबत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे अजित पवारांकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना अनेकदा मागणी करूनही आपल्याला निधी दिला नाही, अशी तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याचवेळी त्यांनी असेही म्हटले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बाजूलाच राहतात. त्यांनी अनेकदा आपल्याला मदत केली आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय होती की इतर काही कारणं आहे, हे पाहावं लागेल.

हेही वाचा – Eknath Shinde : महायुतीची आजची बैठक रद्द; मुख्यमंत्रिपदाची घोषणा लांबणीवर


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -