घरठाणेthaneजितेंद्र आव्हाडांनी घेतली महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची भेट; सरकारकडे नोकरीची केली मागणी

जितेंद्र आव्हाडांनी घेतली महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची भेट; सरकारकडे नोकरीची केली मागणी

Subscribe

ठाणे : यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही सिकंदर शेख याने पटकविला आहे. गतविजेता शिवराज राक्षेला सिकंदर शेख याने अवघ्या 22 सेकंदामध्ये चितपट करत महाराष्ट्र केसरीचा खिताब आपल्या नावी केला. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही शुक्रवारी (10 नोव्हेंबर) पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे आयोजित करण्यात आली होती. यानंतर सर्वत्र सिकंदर शेखवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर शनिवारी (13 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिकंदर शेखची भेट घेत त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारने सिकंदर शेख यांच्यासाठी नोकरीची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Kesari : सिंकदर शेखने महाराष्ट्र केसरीचे मैदान मारले; जल्लोषात उचलली चांदीची गदा

- Advertisement -

यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष

गतवर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षे याने जिंकली होती. सिकंदर शेखला पंचाच्या निर्णयाचा फटका बसल्याचा आरोप कुस्तीतील काही जाणकारांनी केला होता. पण यंदा होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये सिकंदर शेखने जिंकली. यानंतर तर शुक्रवारीच कोल्हापुरातील गंगावेश तालमीत गेला होता. यावेळी सिकंदर शेख यांची मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

हेही वाचा – शिंदे यांच्या टोळीचा ‘डीएनए’ही समोर आला, कीर्तिकर-कदम वादावर ठाकरे गटाचा टोला

सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

2023 चा महाराष्ट्र केसरीचे मैदान मारणारा सिंकदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील रहिवासी आहे. सिकंदरला त्याच्या आजोबांपासूनच कुस्तीचा वारसा मिळालेला आहे. त्या वडिलांना गरिबीमुळे कुस्ती सोडून हमालीचे काम करावे लागले होते.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -