Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांच्या (AJit Pawar) बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. मराठवाड्यात (Marathwada) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार बीड (Beed) जिल्ह्यात असल्यामुळेच शरद पवारांनी पक्ष फुटीनंतरची दुसरी सभा बीडमध्ये आयोजित केल्याची चर्चा आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Jitendra Awhad Mundas did not want to join the party Sharad Pawar gave Gopinath Mundas A secret explosion awhad)
हेही वाचा – Jitendra Awhad : …आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झालेत; आव्हाडांनी बीडमधील सभेत व्यक्त केला विश्वास
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी बीडकरांसमोर आज खरं आणि खोटं करायला आलो आहे. आमच्या पक्षातून गेलेले ओबेसी नेते सांगतात, शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंचं घर फोडले. पण मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, त्यावेळी शरद पवारांना पंडित मुंडे आणि धनंजय मुंडेंना पक्षात घ्यायचं नव्हतं. ते त्यांच्या मतावर ठाम होते आणि त्यांनी या गोष्टीचा त्या दोघांना एक वर्ष थांगपत्ताही लागू दिला नाही, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला.
राज्यात आज एक कुजबुज कॅंपेन सुरू आहे
मी खोटं बोलणार नाही. शरद पवार त्या दोघांना नाही म्हणत होते. यासाठी त्यांनी गोपीनाथ मंडेंनाही फोन केला होता. घर फुटतंय, सांभाळा, पण राक्षसी महत्त्वाकांक्षेला शरद पवार रोखू शकत नव्हते. शरद पवारांचा नाईलाज झाला आणि त्यांनी पंडित मुंडे आणि धनंजय मुंडेंना पक्षात स्थान दिलं. पण आज राज्यात एक कुजबुज कॅंपेन सुरू आहे. असे असले तरी पुरोगामी महाराष्ट्र शरद पवारांच्या खांद्यावर आहे. सत्ता आली काय, गेली काय, शरद पवारांना काही फरक पडत नाही. 1980 ते 1986 च्या काळात शरद पवार सत्तेत नव्हते. सत्ता येते-जाते, पण विचारधारा बदलायची नसते, बाप बदलायचे नसतात. कारण सत्ता आली काय आणि गेली काय शरद पवारांना काहीच फरक पडत नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पळपुट्या बॅनरवर नाव तरी लिहायचं