घरताज्या घडामोडीJitendra Awhad : शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर राष्ट्रवादीचा आक्षेप; वाचा नेमके प्रकरण...

Jitendra Awhad : शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर राष्ट्रवादीचा आक्षेप; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून, अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. उमेदवरांसह स्टार प्रचारकांच्याही याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून, अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. उमेदवरांसह स्टार प्रचारकांच्याही याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत या यादीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर अनेक आरोप केले आहेत. (Jitendra Awhad NCP objection to Shiv Sena and BJP list of star campaigners)

लोकसभा निवडणूक 2024 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच, भाजपने आतापर्यंत महाराष्ट्रातील 24 मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर स्टार प्रचारकांची यादीही महायुतीतील तिन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

त्यानुसार, “लोकसभेच्या निवडणुका खुल्या आणि मोकळ्या वातारणात पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. कालपासून स्टार प्रचारकांच्या याद्या समोर येत आहेत. पण आम्ही तक्रारीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्या शिवसेना पक्षाने आपल्या यादीत दोन चुका केल्या आहेत. ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये जी व्यक्ती बसलेली असते, त्यांचे नाव लिहिण्यास परवानगी आहे. पण त्यांचा ऑफिसचे नाव लिहिण्यास परवानगी नसते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या यादीत नरेंद्र मोदी पंतप्रधान, अमित शहा गृहमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, नितीन गडकरी केद्रीय मंत्री, रामदास आठवले केंद्रीय मंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री अशी यादी जाहीर केली आहे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“पण कायद्यानुसार, ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये जी व्यक्ती बसलेली असते, त्यांचे नाव लिहिण्यास परवानगी, मात्र त्यांचा ऑफिसचे नाव लिहिण्यास परवानगी नसतानाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांची नावे लिहिली आहेत. भाजपने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे नाव लिहिले आहे”, असे म्हणत लोकप्रतिनिधींकडून कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisement -

“कलम 324 नुसार अशा पद्धतीने जर नाव वापरली गेली असतील तर, पूर्ण निवडणुकीत त्यांच्यावर बाद करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे. हा आचारसंहितेचा सर्वात मोठा भंग आहे. कलम 77(1) मध्ये स्टार प्रचारकांचा उल्लेखच नाही आहे. तुम्ही दुसऱ्या पक्षातील नेते आपल्या पक्षाच्या यादीत टाकू शकत नाही. भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे नाव आपल्या यादीत टाकून आचारसंहितेचा भंग केला. एवढंच नाही तर अनेक कलमांचा भंगही करण्यात आला आहे”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर आक्षेप घेतला.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -