Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Jitendra Awhad : ...आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झालेत; आव्हाडांनी बीडमधील सभेत...

Jitendra Awhad : …आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झालेत; आव्हाडांनी बीडमधील सभेत व्यक्त केला विश्वास

Subscribe
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांच्या (AJit Pawar) बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. मराठवाड्याने शरद पवारांना त्यांच्या पडत्या काळात साथ दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. याशिवाय मराठवाड्यात (Marathwada) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार बीड जिल्ह्यात असल्यामुळेच शरद पवारांनी पक्ष फुटीनंतरची दुसरी सभा बीडमध्ये (Beed) आयोजित केल्याची चर्चा आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आधीची पिढी तुमच्या बरोबर लढली आणि आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झाले आहेत, असा विश्वास व्यक्त केला. (Jitendra Awhad  now the grandson is ready to fight for you Awhad expressed his belief in the meeting in Beed)
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, साहेब मला बदल होताना दिसतो आहे. तुमच्या मागे हुके पाटील, दरेकर यांच्यासारखे सगळे माजी आमदार बसलेत आणि आणि त्यांचे नातू पुढे उभे आहेत. हुके पाटलांचा नातू मुंबईच्या एन एम कॉलेजमध्ये शिकायला आहे. साहेब ती पिढी तुमच्या बरोबर लढली आणि आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झाले आहेत. सगळे नातू आले आहेत. एक नैसर्गिक नियम आहे की, मुलगा सोडून गेला तरी नातू आजोबाला सोडत नसतो. साहेब इथे बसलेली सगळी नातू तुम्हाला धरून चालणार आहेत आणि तुम्हाला पुढे करून या बीड जिल्ह्याचा पूर्ण माहोल पुन्हा एकदा शरद पवारमय करणार, याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. 

कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंची आठवण…

बीड हा कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंचा जिल्हा आहे. माझे आणि गोपीनाथ मुंडेंचे अतिशय चांगले संबंध होते. हे सांगताना जितेंद्र आव्हाड यांनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले की, मी विरोधी पक्षात असताना माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर माझी पत्नी गोपीनाथ मुंडेंना भेटायला गेली. त्यांनी विचारलं जितेंद्र का नाही आला? तर ती म्हणाली त्यांना लाज वाटते, त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा आणला होता. ते माझ्या पत्नीला म्हणाले तो वेडा आहे. राजकारणात हे सगळं करायचं असतं. पण त्याच्यावेळी खोटा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचं आयुष्य मी बरबाद होऊ देणार नाही. त्याला घेऊन या. एक मिनिटात गुन्हा मागे घ्यायला लावतो आणि गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावर दाखल झालेला गुन्हा पंधरा दिवसात रद्द करून फाईळ फेकून दिली. असे गोपीनाथ मुंडे होते. त्याची आठवण काढल्याशिवाय मी आजचं भाषण सुरू करू शकत नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -