घरमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाड म्हणतात, मारुती लवकरच चंद्रकांतदादांशी 'बॅचलर'वर चर्चा करणार!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, मारुती लवकरच चंद्रकांतदादांशी ‘बॅचलर’वर चर्चा करणार!

Subscribe

Jitendra Awhad on Chandrakant Patil | जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांना ट्वीटद्वारे टोला लगावला आहे.

Jitendra Awhad on Chandrakant Patil| मुंबई  – आपला कुठलाच देव किंवा महापुरुष बॅचलर नाही. संसार करून सर्व करता येतं, असे वक्तव्य करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन वादाला निमंत्रण दिले आहे. पूर्वी मुले मुलींची टिंगल करायचे आणि आता तर मुली मुलांची टिंगल करतात, असेही पाटील म्हणाले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

“आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळ्यांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, की लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत की नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार,” असा उपरोधिक टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा देव, महापुरुष आणि बॅचलर… चंद्रकांत पाटलांचा नवा दावा

संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष व देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देतात ह्यावर आता सगळ्यांच्या नजारा लागल्या आहेत, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -


जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचे रक्त हिरवे किंवा निळे आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो, असेही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. पुणे येथे राष्ट्रीय युवा दिवस निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -