Homeमहाराष्ट्रCM Fadnavis : मुख्यमंत्र्यांमध्ये बदल दिसतोय, न्याय मिळेल ही अपेक्षा; काय म्हणाले...

CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांमध्ये बदल दिसतोय, न्याय मिळेल ही अपेक्षा; काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

Subscribe

मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड हा तब्बल 19 दिवसांनी मंगळवारी (31 डिसेंबर) पुण्यात सीआयडीच्या शरण आला. त्यानंतर आता राज्यातील सर्वच नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. एकीकडे काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांचे कौतुक केले आहेत, तर दुसरीकडे पोलिसांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीबद्दल सकारात्मक विधान केले. (Jitendra Awhad on CM Devendra Fadanvis and Walmik Karad and Beed Santosh Deshamukh Murder case)

हेही वाचा : Sambhajiraje Chhatrapati : मुंडे, फडणवीस कनेक्शन अन् वाल्मिक कराडबद्दल संभाजीराजेंचा थेट सवाल; केले ‘हे’ मोठे दावे 

“देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची देहबोली बदलली आहे. मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस कोणत्याही गुन्हेगाराला माफ करतील. मी इथेच नाही हे मी सभागृहातमध्येही सांगितले आहे. जी गोष्ट चांगली, ती मान्य केली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेला हा बदल सकारात्मक आहे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले. संतोष देशमुख यांच्यासह सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा करुया, असेदेखील ते म्हणाले.

“गेल्या पाच वर्षांमध्ये जेवढ्या हत्या झाल्या, त्या सगळ्याची चौकशी करा. अनेक लोक तुम्हाला सांगतील त्यामागे कोण आहेत. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचे पत्र आहे की, माझ्या मुलाला उडवून मारले. आम्ही न्यायालयीन चौकशी करायची मागणी करतो आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की मोक्का लावला जाणार असून न्यायालयीन चौकशी होईल. आम्हाला अपेक्षा आहे की, ज्या कठोर पद्धतीने ते बोलले आहेत त्याचप्रमाणे कारवाई करतील,” असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.


Edited by Abhijeet Jadhav