घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र गद्दारीला जन्म देणारा प्रदेश नाही, जितेंद्र आव्हाडांची गुलाबराव पाटलांवर टीका

महाराष्ट्र गद्दारीला जन्म देणारा प्रदेश नाही, जितेंद्र आव्हाडांची गुलाबराव पाटलांवर टीका

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर या बंडात सहभागी झालेल्या आमदारांवर गद्दारीचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. होय, मी मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून गद्दारी केली, असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र गद्दारीला जन्म देणारा प्रदेश नाही, असं म्हणत आव्हाडांनी पाटलांवर टीका केली.

शिवकालापासून मराठा ही व्यापक संकल्पना असल्याने शब्दरुपात राष्ट्रगीतामध्ये महाराष्ट्राचे नाव घेताना मराठा हा शब्द वापरला आहे आणि महाराष्ट्र गद्दारीला जन्म देणारा प्रदेश नाही हे अख्ख्या जगाला माहित आहे. तरिही गुलाबराव पाटील म्हणतात… मराठा मुख्यमंत्री व्हावा म्हणून गद्दारी केली, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

- Advertisement -

जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी संबोधित केलं होतं. यावेळी पाटील म्हणाले होते की, तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत?, असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले होते.


हेही वाचा : संजय राऊतांचा मोदींना सल्ला; म्हणाले, बघा जमतंय का?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -