Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी खारघर प्रकरणातून शासनाने शहाणपण शिकल्यासारखं वाटत नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका

खारघर प्रकरणातून शासनाने शहाणपण शिकल्यासारखं वाटत नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका

Subscribe

नवी मुंबईतील खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. मात्र, या सोहळ्याला गालबोट लागल्यामुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या सोहळ्यात उष्माघातामुळे आतापर्यंत १४ जणांना जीव गमवावा लागलाय. दरम्यान, खारघर प्रकरणातून शासनाने शहाणपण शिकल्यासारखं वाटत नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केली.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली. खारघर प्रकरणातून शासनाने काही शहाणपण शिकल्यासारखं वाटत नाही. ठाणे येथिल जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन हे भरदुपारी 12.00 वाजता ठेवण्यात आलेले आहे.शासन निर्णय 12 ते 4 ह्या वेळेत कार्येक्रम घेऊ नये . आता ह्यावर मी अधिक काही लिहू इच्छित नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीला विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अशी समिती नेमण्यापेक्षा चौकशी न केलेलीच बरी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राज्य सरकारचा मोठा निर्णय

जी घटना घडली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशी घटना घडेल याबाबत कुणालाही कल्पना नव्हती. त्या दिवशी जे काही झालं त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये. तसेच कोणाला त्रासही होऊ नये. यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. जोपर्यत कडाक्याचं ऊन आणि गरमीची स्थिती आहे. तोपर्यंत १२ ते ५ या वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय घेतल्याची माहिती भाजप नेते आणि पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.


हेही वाचा : दुपारी १२ ते ५ या वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम नाही, मंगलप्रभात लोढांची माहिती


 

- Advertisment -