घरठाणेजितेंद्र आव्हाडांच्या पोस्टमुळे उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले

जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टमुळे उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले

Subscribe

उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाच्या काही नेत्यांसह मुंब्य्रातील पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला भेट देणार आहेत. परंतु, त्याआधीच तेथील राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

ठाणे : 2 नोव्हेंबरला ठाण्यातील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात असलेली 22 वर्षे जुनी शाखा पाडण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर चालवून ती शाखा पाडण्यात आली. ज्यामुळे आता आज (ता. 11 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाच्या काही नेत्यांसह या पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला भेट देणार आहेत. परंतु, त्याआधीच मुंब्य्रातील राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या पोस्टमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्यास हातभार लागला आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. (Jitendra Awhad post heated up political atmosphere before Uddhav Thackeray arrived in Thane)

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावरून संजय राऊतांचे ठाणे पोलीस आयुक्तांना आव्हान, म्हणाले…

- Advertisement -

मुंब्य्रातील शिवसेना ठाकरे गटाची शाखा तोडल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज ठाण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी ठाण्यात, मुंब्य्रात आणि मुलुंड येथे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. मात्र, मुंब्र्यातील होर्डिंग्ज अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे आता निदर्शनास आले आहे. परंतु, याबाबतची पोस्ट X या सोशल मीडिया साईटवर जितेंद्र आव्हाडांकडून आधीच करण्यात आली. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांना मुंब्य्रात येऊच देणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचा आरोपही या पोस्टच्या माध्यमातून आव्हाड यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका उपस्थित करत मी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती, परंतु, पोलिसांकडून यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाडांची पोस्ट?

“मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे @OfficeofUT यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी,”असे काहीही होणार नाही,आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे”,अस मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते. आज दूपारी उद्धव साहेबांचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते.यातील 90% होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत.मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात.आणि “सर्वत्र नजर असणाऱ्या” पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही.आता पोलीस मला म्हणत आहेत की,”उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!” असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि @ThaneCityPolice यांचे आभार मानतो.ते “त्यांची ड्युटी” मोठ्या निष्ठेने करत आहेत. “मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है,जो मंजुरे खुदा होता हैं..!”

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया साईटवर असलेल्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची पोस्ट केली आहे. तर आव्हाडांनी त्यांच्या या पोस्टमधून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत पोलिसांवर आरोपही केले आहेत. ज्यामुळे आव्हाडांच्या एका पोस्टमुळे उद्धव ठाकरे ठाण्यात येण्याआधीच आणखी एक वाद चिघळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणेज जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या पोस्टसोबत बॅनर फाडल्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. “मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि @ThaneCityPolice यांचे आभार मानतो.ते “त्यांची ड्युटी” मोठ्या निष्ठेने करत आहेत.” अशी टीका देखील त्यांनी त्यांच्या या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

मुंब्य्रातील 22 वर्ष जुनी शिवसेना ठाकरे गटाची शाखा बुलडोझर चालवून तोडण्यात आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज मुंब्य्रात येणार आहेत. दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघतील. त्यानंतर 4 वाजता ते मुंब्य्रात पोहोचतील. यावेळी ते स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याने मुंब्य्रात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पोलिसांकडून उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याआधी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -