घरमहाराष्ट्रअजित पवारांच्या विरोधात आव्हाडांची भूमिका; आंदोलन तीव्र करणार असल्याचा दिला इशारा

अजित पवारांच्या विरोधात आव्हाडांची भूमिका; आंदोलन तीव्र करणार असल्याचा दिला इशारा

Subscribe

महाराष्ट्रातून उग्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणालाही शरद पवार यांचा राजीनामा मान्य नाही. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ही उग्रता उद्यापासून अधिक वाढीला लागेल- जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि एकच खळबळ उडाली.  त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते मात्र भावूक झाले आहेत. तसंच हा निर्णय तत्काळ मागे घ्या, अशीही विनंती ते करताना दिसत आहेत. कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. त्यानंतर अजित पवार यांनी समोर येत येत्या दोन ते तीन दिवसांत शरद पवार आपला अंतिम निर्णय सांगतील, असं सांगितले आणि उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. परंतु आता त्यांच्या या आवाहनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.(  Jitendra Awhad s role as opposed to Ajit Pawar signaled to intensify the movement )

काय म्हणाले आव्हाड?

आता उद्या आम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही साहेबांना जाऊन सांगू नका की, राजीनामा मागे घ्या म्हणून. पण लोकांचं शरद पवार यांच्यावर प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाला तुम्ही थांबवू शकत नाही. उद्या शरद पवार यांनी जरी सांगितलं की याविषयी आंदोलन करु नका. तरीही लोकं करतील. तेवढा आमचा शरद पवार यांच्यावर अधिकार आहे, अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

महाराष्ट्रातून उग्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणालाही शरद पवार यांचा राजीनामा मान्य नाही. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ही उग्रता उद्यापासून अधिक वाढीला लागेल. उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरु होतील. लोकं शरद पवार यांचंही ऐकायला तयार नाहीत. लोकांचं म्हणणं आहे की, शरद पवार यांना राजीनामाच द्यायचा नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

( हेही वाचा: Nitesh Rane on Ajit Pawar : ‘टिल्ल्या’ म्हणून हिणवणारे अजित पवार हे नितेश राणेंसाठी ‘करमुक्त’! )

- Advertisement -

शरद पावारांचा राजीनामा अमान्य

पडद्यामागे काय घडतंय हे मला माहिती नाही. पण शरद पवार यांचा राजीनामा अमान्य आहे. मी माझ्या भावना उत्कटपणे व्यक्त करत असतो. त्यांचा राजीनामा आम्हाला अमान्य आहे, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवार हे बडे नेते आहेत. ते काय करु शकतात हे मी सांगू शकत नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना सांगण्याचं माझं काम आहे. ते राहतील. ते जबाबदारी पार पाडतील. मविआला सत्तेवर बसवतील हे सगळं खरं आहे. पण ते आम्हाला पक्षाच्या अध्यक्षपदी हवेत, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -