Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र पेगाससच्या म्हणण्यानुसार ते सॉफ्टवेअर भारत सरकारने विकत घेत वापर केला - जितेंद्र...

पेगाससच्या म्हणण्यानुसार ते सॉफ्टवेअर भारत सरकारने विकत घेत वापर केला – जितेंद्र आव्हाड

Related Story

- Advertisement -

इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं जात आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील भारत सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. “पेगाससच्या म्हणण्यानुसार ते आपलं सॉफ्टवेअर कुणाही ऐऱ्यागैऱ्याला विकत नाहीत. संबंधित देशाच्या मान्यताप्राप्त सरकारलाच विकतात. खुद्द भारत सरकारने ते विकत घेतलं आणि त्याचा वापर केला असा स्पष्ट निष्कर्ष निघतो. ज्या ४० देशांनी ते घेतलंय त्यांची नावं सांगायला मात्र ते तयार नाहीत,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी अजून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी फोन टॅप केले जात असतील तर त्याला जो निधी लागतो तो कोणी मंजूर केला? की त्यातही नविन कांड आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. “तज्ञांच्या मते ५० फोन निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी १० मिलियन डॉलर लागतात. एवढ्या फोन्ससाठी किती खर्च आला असेल? कुणी तो मंजूर केला? की त्यातही नवीन कांड आहे?” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -