भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचं त्यांचंच (उपमुख्यमंत्री अजित पवार). पण आमदारांना भाजपात किंवा एनडीएमध्ये सामील व्हा, असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रांपासून अनेक विषयांवर सविस्तर भाष्य केलं आहे. (Jitendra Awhad says… Who made Ajit Pawar president? They have no evidence )
अजित पवारांना अध्यक्ष कोण केलं?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पक्षाचे अध्यक्ष हे अजित पवार असून त्यासंबंधित बैठकीत निर्णय झाल्याचं सांगितलं होतं. त्यावर आज जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 30 जूनला अजित पवार गटाने आम्ही बैठक घेऊन अजित पवार यांना अध्यक्ष केल्याचं जाहीर केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही फोनवरून बैठक घेतली. परंतु फोनवरून अशी बैठक होत नाही. अजित पवारांना अध्यक्ष म्हणून कोणी नेमलं? त्यांना अध्यक्ष करण्यासाठी कोणी पाठिंबा दिला? यासंबंधित काहीही पुरावा नाही, अजित पवार गट खोटं बोलत आहे.
सोमवारची अजित पवार गटाची पत्रकार परिषद ही खोटं कसं खरं आहे हे दाखवण्यासाठी असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते म्हणाले की, अजित पवार यांनी 3 जुलैला मान्य केलं होतं की शरद पवार हेच आमचे अध्यक्ष आहेत.मग अचानक अजित पवार अध्यक्ष कसे काय झाले? पक्षातल्या 95 टक्के लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत.
अजित पवार अध्यक्ष होण्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सही कशी काय करतात? आणि त्याला पाठिंबा प्रफुल पटेल यांनी दिला होता. त्यांची देखील त्यावर सही होती, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
(हेही वाचा Pankja Munde :’माझा संघर्ष गोपीनाथ मुंडेंपेक्षाही मोठा; मला एकाचवेळी अनेक पातळ्यांवर लढावे लागते’ )