याद राखा कोणाच्या भाकरीवर टाच आणाल तर योग्य नाही, जितेंद्र आव्हाडांचा किरण मानेंना मालिकेतून काढल्यावरून संताप

हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही. अशा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

jitendra awhad support actor kiran removed from mulgi zali ho serial
याद राखा कोणाच्या भाकरीवर टाच आणाल तर योग्य नाही, जितेंद्र आव्हाडांचा किरण मानेंना मालिकेतून काढल्यावरून संताप

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेता किरण माने हा विलास पाटलाची भूमिका साकारत आहे. किरण मानेंनी राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. किरण मानेंनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. त्यांना मालिकेतून काढल्यामुळे आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा संताप व्यक्त केला आहे. जर कोणाच्या भाकरीवर टाच आणाल तर योग्य नाही. याद राखा अशा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता किरण मानेला मालिकेतून काढल्यामुळे संतापले आहेत. किरण माने लोकप्रिय अभिनेते असून ते राजकीय विचार मांडत असतात. कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांच्या विरोधातही त्यांने अनेकदा भूमिका घेतली आहे. मोठ्या पडद्यावरही किरण मानेंनी अनेक भूमिकांमध्ये काम केले आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला काढून टाकण्यात आले असल्याचे किरण माने यांनी म्हटलं आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले. या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे, निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा,हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही. अशा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

हा सांस्कृतिक दहशतवाद – असीम सरोदे

अभिनेता किरण माने यांच्या समर्थनार्थ सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अॅडव्होकेट असीम सरोदे केवळ वेगळी राजकीय भूमिका मांडली, शेतकरी आंदोलन दडपले गेले याबाबत मत व्यक्त केले म्हणून मुलगी झाली हो मधील धडाकेबाज विलास पाटील ही भूमिका करणाऱ्या किरण माने यांना स्टार प्रवाह मालिकेतून काढून टाकण्यात आले हा सांस्कृति दहशतवाद आहे हे नक्की, कणा असलेल्या निवडक मराठी कलाकारांपैकी एक किरण माने यांना पाठिंबा असल्याचे असीम सरोदे म्हणाले आहेत.


हेही वाचा : Corona In India: कोरोना वाढणाऱ्या राज्यांची पंतप्रधानांच्या बैठकीत मुस्कटदाबी, कोणत्या राज्यांची हुकली संधी?