घरमहाराष्ट्रJitendra Awhad : देश आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होतोय, आव्हाड असे का म्हणाले?

Jitendra Awhad : देश आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होतोय, आव्हाड असे का म्हणाले?

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, बुधवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) 21 मार्च रोजी अटक केली. त्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Nashik Constituency : भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच; तर भुजबळ म्हणतात, जागा आमच्यासाठी सुटत नाही तोपर्यंत…

- Advertisement -

सीएएवर भाष्य केल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत अमेरिकेती जो बायडेन प्रशासनाने प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भातील घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. यासंदर्भात निष्पक्ष, निर्धारित काळात तसेच पारदर्शक कायदेशीर प्रक्रिया व्हावी, असे आम्हाला अपेक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

- Advertisement -

त्याआधी जर्मनीने देखील यावर टिप्पणी केली होती. आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. भारत हा लोकशाही असलेला देश आहे. न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित सर्व मानके आणि मूलभूत लोकशाहीची तत्त्वे या प्रकरणातही लागू होतील, अशी आम्हाला आशा आहे. निष्पक्षपणे सुनावणी घेण्याचा केजरीवाल यांना पूर्ण अधिकार आहेत. ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय सर्व उपलब्ध कायदेशीर मार्गांचा वापर करू शकतील. (दोषी सिद्ध होईपर्यंत) सर्वांना निर्दोष मानणे हा अंदाज हा कायद्याचे प्रमुख तत्व आहे आणि ते या प्रकरणातही लागू झाले पाहिजे, असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.

यासंदर्भात राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. अमेरिकेने, आपण केजरीवाल खटल्यावर लक्ष ठेवून आहोत. हा खटला पारदर्शक पद्धतीने चालेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. म्हणजेच, आधी जर्मनीने केलेले विधान आणि आता अमेरिकेचे विधान पाहता, हा देश आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Vijaypat Singhania : इच्छा नसतानाही…; विजयपत सिंघानियांनी गौतमसोबतच्या भेटीबाबत केला खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -