Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रJitendra Awhad : राजकारणात एवढे प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल होती...; आव्हाडांनी शेअर केले...

Jitendra Awhad : राजकारणात एवढे प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल होती…; आव्हाडांनी शेअर केले बाळासाहेबांचे पत्र

Subscribe

मुंबई : सध्याच्या लोकशाहीच्या रणधुमाळीत आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (एनसीपी-एसपी) प्रमुख शरद पवार यांना लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर एनसीपी एसपीचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 15 नोव्हेंबर 2006 रोजी शरद पवार यांना लिहिलेले पत्र शेअर केले आहे.

हेही वाचा – Sanajay Raut : भाजपाने ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी; संजय राऊतांचे आव्हान

- Advertisement -

शिवसेनाप्रमुखांनी पत्र लिहून शरद पवार यांना वडीलधाऱ्याच्या नात्याने आदेश दिला होता. त्यातील प्रत्येक शब्दात आपलेपणा दिसतो. नाहीतर द्वेष आणि सूडाने भरलेल्या आजच्या राजकारणात कोण कधी मरतो याची वाट पाहणारे आहेत, असे म्हणत डॉ. आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. नवीन पिढी हे पत्र वाचेल तर म्हणेल, “राजकारणात एवढे प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल होती”

- Advertisement -

काय आहे त्या पत्रात? (Jitendra Awhad Shared a Letter of Balasaheb Thackeray)

आदरणीय शरदचंद्रजी पवार
कृषी, अब व नागरी पुरवठा मंत्री, हिन्दुस्थान सरकार, नवी दिल्ली
प्रिय शरदबाबू यांसी
जय महाराष्ट्र!

आपण केंद्र शासनात कृषिमंत्री या पदावर विराजमान आहात. तरीपण हे पद बाजूला सारून आपल्याला मी माझे जुने मित्र शरदबाबू या नावानेच विचारणार आणि बोलणार. आपण बरे हे ऐकून बरे वाटले, परंतु वडीलधाऱ्या अधिकाराने आम्ही आपल्याला आदेश देत आहोत की, यापुढे जरा वणवण कमी करा. झेपेल तेवढे जरूर करा! पण अलीकडे आपला दौऱ्यावर जाण्याचा सुकाळ झाला होता. वाकड्यातिकड्या मार्गाने आपण दौरे करीत होता, परदेश दौऱ्यांतही कोठे कमतरता नव्हती. आपल्या पक्षाची निशाणी जरी घड्याळ असली तरी आणि त्या घड्याळाचे काटे जरी स्थिरावले असले तरी, आपल्या आयुष्याचे घडचाळ टिक टिक करीत त्याचे काटे पुढे सरकतच असतात, हे विसरू नये.

हेही वाचा – Thackeray group : मोदी सरकारचे ‘व्यावसायिक प्रेम’ जगजाहीर, ठाकरे गटाचा घणाघात

सोनियाच्या ‘कथली’ राजवटीत आपण अन्न व शेती मंत्री आहात. सध्याच्या परिस्थितीत हे महत्त्वाचे खाते आपण सांभाळीत आहात. त्यामुळे फक्त महाराष्ट्राला नव्हे तर, देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे. त्यामुळे स्वतःसाठी नसले तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तुम्हाला जगावेच लागेल, त्याप्रमाणे वागणूक ठेवावी व प्रकृतीची काळजी घ्यावी.

ताजा कलम आपण घरी आल्यावर हितचिंतकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या दारावर आदळतील त्यांना आवर घालावा!

हेही वाचा – Congress : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला दिलासा; निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -