घरमहाराष्ट्रJitendra Awhad : 70 वर्षांत असे कधीच झाले नाही, तामिळनाडू प्रकरणावरून आव्हाडांची...

Jitendra Awhad : 70 वर्षांत असे कधीच झाले नाही, तामिळनाडू प्रकरणावरून आव्हाडांची भाजपावर टीका

Subscribe

मुंबई : द्रमुक नेते के. पोनमुडी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतरही त्यांची पुन्हा मंत्रीपदी नियुक्ती करण्यास नकार दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांना फैलावर घेतले होते. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे.

हेही वाचा – CM Eknath Shinde : विरोधकांवर टीका करा पण…, मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना पदाधिकारी, प्रवक्त्यांना सूचना

- Advertisement -

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच तामिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांना दोषी ठरवून कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची दोषसिद्धी तसेच कारावासाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे तामिळनाडू सरकारने पोनमुडी यांना पुन्हा मंत्रीपद देण्याची मागणी केली होती. परंतु त्यांची शिक्षा केवळ स्थगित करण्यात आली असल्याचे सांगत राज्यपालांनी त्यास इन्कार केला होता. परिणामी, तामिळनाडूतील एम के स्टॅलिन सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावत, राज्यपाल संविधानाचे पालन करत नसतील तर सरकार काय करत आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे, हा न्यायालयाचा अवमान असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाला राज्यपालांच्या बाबतीत सार्वजनिकरित्या असे विधान करावे लागत आहे, ही अतिशय लाजीरवाणी बाब असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. भारताच्या इतिहास कदाचित असे पहिल्यांदाच घडत असेल जिथे सर्वोच्च न्यायालयास राज्यपालांना त्यांच्या संवैधानिक अधिकारांची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. गेल्या 70 वर्षांत काय झाले, असा प्रश्न भाजपावाले कायम विचारत असतात. आजची घटना त्याचं उत्तर आहे; गेल्या 70 वर्षांत असे कधीच झाले नाही, असे आव्हाड यांनी सुनावले आहे.

राज्यपाल हे पद भाजपाने 2014पासून केंद्र सरकारच्या हातातातील बाहुले बनवले आहे. सरकार फोडण्यासाठी, आपल्या मर्जीचे सरकार स्थापन करण्यासाठी आणि पाहिजे त्या पद्धतीने हस्तक्षेप करण्यासाठी राज्यपालांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रातही भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना त्यांचे वर्तन किती पक्षपाती होते, हे सर्वांनी पाहिलेच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – Rohit Pawar : पैलवान कधीच म्हातारा होत नसतो; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -