घरताज्या घडामोडी...तर मोठ्या मनाने माफ करा, आव्हाडांनी घेतला कर्मचाऱ्यांचा निरोप

…तर मोठ्या मनाने माफ करा, आव्हाडांनी घेतला कर्मचाऱ्यांचा निरोप

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता राज्यात शिवसेना-भाजप असं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. परंतु सरकार कोसळल्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय निवासस्थानात कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांचा निरोप घेतला आहे.

- Advertisement -

गृहनिर्माण विभागाच्या राज्याचा कारभार सांभाळत असताना आव्हाडांनी सर्व कमर्चाऱ्यांची भेट घेतली. सर्व स्टाफची अनमोल मदत झाली. या सर्वांचा निरोप घेतला आहे. त्यांचे शतश: आभार, अशा आशयाचे ट्विटही त्यांनी केले आहे. या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मोठ्या मनाने माफ करा, असं आव्हाड म्हणाले.

या अडीच वर्षांमध्ये माझ्या शासकीय बंगल्यावर आलेला जेवण न-करता गेला असेल. असे मला वाटत नाही. ए-३ म्हणजे जवळ-जवळ अन्नपूर्णाच झाली होती. माझे आचारी तसेच जेवण वाढणाऱ्यांनीही कधी त्याबाबत तक्रार केली नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि माझे अत्यंत खेळीमेळीचे संबंध होते. माझ्याबरोबर त्यांचे अडीच वर्षातील वागणे यामध्ये कुठेही ते कर्मचारी आहेत आणि मी मंत्री आहे असे नव्हते, असं देखील आव्हाड म्हणाले.


हेही वाचा : आरे कारशेडचा आग्रह म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ; नाना पटोलेंचा आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -