घरमहाराष्ट्रJitendra Awhad : आतापर्यंत आम्ही गप्प होतो पण आता...: आव्हाडांचा दादा गटाला...

Jitendra Awhad : आतापर्यंत आम्ही गप्प होतो पण आता…: आव्हाडांचा दादा गटाला इशारा

Subscribe

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही पवार नसता तर बारामतीतून निवडूण आला असता का? आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो, पण आता तुम्ही थेट शरद पवारांवर बोलत असाल तर आम्हीही काही गप्प बसणार नाही, आता जशास तसे उत्तर मिळतील असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला दिला.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील पक्षाच्या वैचारिक मंथन शिबिरात केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर मिळत आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट आता अजित पवार गटाला इशारा दिला आहे. (Jitendra Awhad  Until now we were silent but now… Awhads warning to the Dada group)

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही पवार नसता तर बारामतीतून निवडूण आला असता का? आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो, पण आता तुम्ही थेट शरद पवारांवर बोलत असाल तर आम्हीही काही गप्प बसणार नाही, आता जशास तसे उत्तर मिळतील असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये 1991 पासून खुनाची मालिका सुरू झाली आहे, त्यामागे कोण आहे याचा शोध लावा. बारामतीत सुप्रिया सुळेंविरुद्ध निवडणूक लढतायेत तर त्यासाठी एवढा गाजावाजा कशासाठी, आणि आता बोलताना आमची नावे का घेता, मी कुठल्याच बैठकीला नव्हतो, जितेंद्र आव्हाडाला कुणीही टपली मारतो, कारण तर काहीच करू शकत नाही.

- Advertisement -

हेही वाचा : AJIT PAWAR : देशाचं सांगू शकत नाही पण…; ‘दादां’चे प्रकाश आंबेडकरांच्या भाकितावर भाष्य

- Advertisement -

पाच वर्ष शरद पवारांचं डोकं को खात होतं?

सत्तेत सहभागी होण्यामागे शरद पवारांचाच हात होता असा आरोप अजित पवार यांनी केला, यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांचं प्लॅनिंग कधीपासून सुरू होतं याबाबत स्वतःच्याच मनाला त्यांनी विचारायला हवं. मागील पाच वर्ष शरद पवारांचं डोकं कुणी खाल्लं, चला बीजेपीत, चला बीजेपीत. तुम्हीच म्हणत होता ना असा थेट हल्ला आव्हाडांनी अजित पवारांवर केला.

हेही वाचा : Ajit Pawar On Deshmukh : देशमुख म्हणाले- ‘मी मंत्रिमंडळात नाही तर सोबत नाही’; दादांचा…

शरद पवांराचा राजकीय प्रवास संपवण्याची खेळी

अजित पवार यांनी केलेल्या विविध खुलाशानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांना जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले की, 2014 पर्यंत कोणी बोलत नव्हते. कारण सत्तेत होते. शरद पवारांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीस मिळवायचा, जो चेहरा त्यांनी महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा त्यांनी तयार केला तो कायमचा संपवून टाकायचा पण आपण सत्तेत रहायचं हे आम्हाला नामंजूर होतं. सत्ता ही आमच्यासाठी महत्वाची नाही, पण शेवटी काही विचार काही तत्व ही जपून ठेवलेली आहेत. पण तुम्हाला याचं काहीही घेणं देणं नव्हतं. बाकी सगळं गेलं खड्ड्यात फक्त सत्ता पाहिजे असेसुद्धा यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -