Homeमहाराष्ट्रAssembly Results : भाजपाला जिंकणे महत्त्वाचे का होते? आव्हाडांच्या मुलीचा खळबळजनक दावा

Assembly Results : भाजपाला जिंकणे महत्त्वाचे का होते? आव्हाडांच्या मुलीचा खळबळजनक दावा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा 95 हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजय झाला. मात्र तेही ईव्हीएमवर शंका घेत आहेत. अशातच त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना भाजपाला जिंकणे का महत्त्वाचे होते? याची कारणं सांगितली आहेत.

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 235 जागांवर विजय मिळवला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 50 मिळवत पराभवाला सामोरे जावे लागले. दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमवर आरोप करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा 95 हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजय झाला. मात्र तेही ईव्हीएमवर शंका घेत आहेत. अशातच त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना भाजपाला जिंकणे का महत्त्वाचे होते? याची कारणं सांगितली आहेत. (Jitendra Awhads daughter Natasha targets BJP over assembly election results)

नताशा आव्हाड यांनी ट्वीट करताना म्हटले की, निवडणूक निकालात फेरफार करून भाजपा स्वतःला 100 च्या आसपास जागा घेऊन शांत बसली असती. पण त्यांनी इतक्या जास्ती जागाच (132) टार्गेट का ठेवलं? त्याचप्रमाणे सहकारी पक्ष शिवसेना (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar) इतक्या जास्त जागा का वाढवून दिल्या? महाविकास आघाडीला 50 जागांच्या खाली का ठेवल गेले? कारण भाजपासाठी ही एक अतिमहत्त्वाची निवडणूक होती आणि काहीही झाले तरी भाजपाला सत्तेत यायचे होते. शिवाय, दोन युती पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला त्यांच्याशी किंवा महाविकास आघाडीसोबत सौदा करण्याची संधीच द्यायची नव्हती. यासाठी निकाल इतका हुशारीने तयार करण्यात आला की त्यात भाजपाशिवाय कोणालाही सरकार स्थापन करता येणार नाही, याची काळजी घेतली गेली, असा खळबळजनक दावा नताशा आव्हाड यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jayant Patil : मंत्रिमंडळ विस्तार रखडला; जयंत पाटील यांनी महायुतीवर साधला निशाणा

- Advertisement -

भाजपाला जिंकणे इतके महत्त्वाचे का होते? असा प्रश्न उपस्थित करत नताशा आव्हाड यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. पहिलं म्हणजे अदानीने धारावी प्रकल्प गमावला असता, दुसरं म्हणजे केंद्रातील त्यांचे सरकार धोक्यात आले असते आणि तिसरं म्हणजे भाजपा महाराष्ट्राच्या राजकारणातून बेदखल झाली असतील. यामुळेच महाराष्ट्राचा निकाल निवडणुकीपूर्वीच दिल्लीत ठरवला गेला. राज्यात झालेल्या निवडणुका फक्त दिखावा होता, असा गंभीर आरोपही नताशा आव्हाड यांनी केला आहे.

हेही वाचा – Eknath Khadse : मंत्रिमंडळ विस्ताराला उशिर होण्याचे कारण; एकनाथ खडसे म्हणाले, गृहमंत्री… 


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -