बाबासाहेबांचा विरोध होता तर संविधानात ३७० कसं आलं?, जितेंद्र आव्हाडांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Jitendra Awhad's reply to Devendra Fadnavis how did 370 come in the constitution If Babasaheb was opposed
बाबासाहेबांचा विरोध होता तर संविधानात ३७० कसं आलं?, जितेंद्र आव्हाडांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्यात जातीयवाद केला असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट करुन पवारांवर निशाणा साधला होता. राज्यात हिंदी टेरर हा शब्द पहिला शरद पवार यांनी वापरला आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कलम ३७० ला कडाडून विरोध होता तर मग संविधानात त्याचा उल्लेख कसा? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना केला आहे. शरद पवारांमुळे महाराष्ट्रात जातीयवाद झाला असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला विरोध होता असे फडणवीस म्हणाले यावर आव्हाडांनी पलटवार केलाय. जर बाबासाहेबांचा विरोध होता तर संविधानात कसं आलं? हे मला कळालं नाही. हिंदू कोड बिलाला विरोध होता तर स्त्रियांना ५० टक्के वाटा कसा देण्यात आला? तसेच त्यावेळचा सामाजिक राजकीय वातावरणाचा अभ्यास केला तर पुरुष प्रधान संस्कृतीला महत्त्व दिलं जात होतं असे समोर येईल. त्यावेळी स्त्रियांना ५० टक्के वाटा द्यावा असे राजकीय नेत्यांना वाटत नव्हते पंरतु बाबासाहेबांना योग्य वाटत होतं. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी काश्मीर फाईल्सवरुन फडणवीसांवर पलटवार केला आहे. काश्मीर फाईल्सपेक्षा तुमचा काश्मीरच्या विकासामध्ये आणि काश्मीरी पंडितांच्या विकासामध्ये योगदान किती हे बोला? चित्रपट दाखवून काय होणार असा सवाल आव्हाडांनी केला आहे.

१९९३ ची आठवण कशाला काढताय?

जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांच्या ट्विटमधील मुंबई साखळी बॉम्ब स्फोटाच्या आरोपावरही प्रत्युत्तर दिलं आहे. बॉम्ब स्फोटानंतर १३ वा स्फोट मुस्लिम वस्तीमध्ये झाला असल्याचे मला माहिती नाही. परंतु ९३ ची आठवण कशाला काढताय, ती आठवण काढू नका असे आव्हाड म्हणाले आहेत. तसेच नथुराम गोडसेंनी गांधींची हत्या केली. त्यावर कोणी पेढे वाटले आणि कोणी गुलाल उधळला? संविधान कोणी नाकारलं? तिरंग्यामध्ये तीन रंग येतात हे वाईट आहे का? इतिहास खणून त्याच्यातील हाडं बाहेर काढणं माझ्या दृष्टीने सर्व चुकीचे आहे. काही विषय हे तिथल्या तिथेच बंद करायचे असतात असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. दरम्यान इशरत जहाँबाबत कधीही कोणी काय म्हटलं नाही. ते कोणताही आरोप करतील त्यांना आरोप करायला काय जातंय? आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे असं थोडी आहे. दरम्यान जेम्स लेनवर वाद घालण्याची आम्हाला इच्छा नाही. जेव्हा वाद घालायचा होता तेव्हा तुम्ही घरात बसला होता असा टोला फडणवीसांना लगावला आहे. तुमच्याच लोकांनी महाराष्ट्रात जेम्स लेनचे पुस्तक आणले होते असे आव्हाड म्हणाले.


हेही वाचा : जातीयवादावरुन फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा, १४ ट्विटमध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट ते काश्मीर फाईल्सचा संदर्भ