मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला…; ऋता आव्हाडांचा संताप

jitendra awhads wife on ruta awhad motive of woman accusing jitendra awhad

काल जेव्हा दोघांचं भांडण झालं तेव्हाचं मला वाटलं होत काही तरी घडेल, कारण हल्ली कोणालाही कोणतीही टीका खरी असली किंवा खोटी तरी ती सहन होत नाही. जास्तीत जास्त काय होऊ शकतं माणसाचा मृत्यू… आय एम रेडी…. असल्याच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी म्हणत, मर्द असाल तर कामाचं उत्तर कामातून द्या तुम्ही असं ना मर्दासारखं बाईला पुढे ठेऊन राजकीय हत्या करू नका ती होणार नाही. अशा इशाराही त्यांनी दिला आहे. ऋता आव्हाड या आज माध्यमांशी बोलत होत्या.

ऋता आव्हाड म्हणाल्या की, ती महिला भाजपची कार्यकर्ता आहे का? आधी त्याचा शोध लावा. त्यांना कधी दिलं होतं पत्र त्याचा शोध लावा. कारण त्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या घरी जाऊन जेवण जेवतात. त्या एकट्याचं कार्यकर्त्या काल भाजपच्या कार्यक्रमाला होत्या, भाजपंच एकही कार्यकर्ता तिथे नव्हता. त्या मुंब्य्रात राहत नाहीत. या महिलेने यापूर्वी आव्हाडांविरोधात अगदी अश्लाघ्य भाषेत टीका केली. दरवेळी आपण महिलांचे अधिकारी महिलांचे अधिकार बोलतो, पण महिलांना दुसऱ्यांबद्दल इतक्या अर्वाच्च भाषेत बोलण्याचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अंजली दमानिया यांचे आभार 

यावेळी ऋता आव्हाड यांनी आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे आभार म्हणत म्हटले की, अंजली दमानिया सातत्याने राजकीय विरोधक असतात, वैचारिक विरोधक असतात, मात्र आज त्यांनाही कुठेतरी वाटलं हे चुकतयं, हे त्या चॅनलवरचं बोलल्या आहे.

…तर आता हा बालीशपणा

काल ज्या महिला कार्यक्रमात होत्या, धक्काबुक्की झाली त्या सर्व महिलांनी विनयभंगाच गुन्हा दाखल करायचा का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून राष्ट्रवादीच्याही नगरसेविकांना धक्काबुक्की झाली, त्यांचे पण हात कुठे कुठे लागले, म्हणून आम्ही बालिशपणा करत विनयभंग विनयभंग ओरडणार नाही. जर मला माझ्या इज्जतीची एवढं काळजी वाटते तर गर्दीच्या ठिकाणी जाण्य़ाचं टाळायचं असतं. एका माणसाला चालायला जागा नाही तिथे दोघे जणं आल्यानंतर कोणतरी कोणाला तरी बाजूला करणार. दुसरं काहीही मिळालं नाही म्हणून काय करणार तर आता बालीशपणा… अशी टीका ऋता आव्हाड यांनी केली आहे.


खोट्या-नाट्या केसेसविरोधातील ही लढाई, आव्हाडांनी लढावं; सुप्रिया सुळेंचं आवाहन