Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र जिवा महालांच्या वंशजांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून मदत; एवढ्या 'लाखांचा' दिला धनादेश

जिवा महालांच्या वंशजांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून मदत; एवढ्या ‘लाखांचा’ दिला धनादेश

Subscribe

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक राहिलेल्या जिवा महाला यांच्या 14 व्या पिढीतील वंशजांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांच्या घरातील मुलीचे साध्यासोप्या पद्धतीने लग्न होणार असले तरी तो खर्च करणे महाले कुटुंबाला शक्य नव्हते. याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांना मिळताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. (Jiva Mahal, who was the bodyguard of Chhatrapati Shivaji Maharaj)

शिवकाळात आपल्या अपार धैर्याने अजरामर झालेल्या जिवा महाला यांच्या वंशजांच्या 14 व्या पिढीतले प्रकाश महाले हे महाबळेश्वरमधील कोंढवली गावी वास्तव्यास आहेत. मात्र ते गेल्या काही वर्षांपासून पक्षाघाताच्या व्याधीने अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या या आजारपणामुळे त्यांची पत्नी जयश्री महाले यांना शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल त्यांनी प्रतीक आणि प्रतीक्षा या दोन अपत्यांना लहानाचे मोठे केले आहे. मात्र त्यांची मुलगी प्रतीक्षा हिचे आता लग्नाचे वय झाले आहे. पुढील तीन दिवसात (१२ मे) प्रतीक्षा महाले हिचा विवाह होणार आहे. साध्यासोप्या पद्धतीने विवाह होणार असला, तरी विवाह म्हणजे खर्च हा होतोच आणि हा खर्च महाले कुटुंबासाठी करणे शक्य नव्हते. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांना मिळताच त्यांनी महाले कुटुंबियांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.

- Advertisement -

जिवा महाले यांच्या वंशाजातील प्रकाश महाले यांच्या मुलीचा म्हणजेच प्रतीक्षा प्रकाश महाले हिच्या लग्नासाठी लता शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. लता शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाच्या पूर्वनोंदणी विक्रीतून जमा झालेल्या 1 लाख रुपये रकमेचा धनादेश गुरूवारी (4 मे) वाई येथे महाले कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पुस्तकांचे गाव भिलारच्या सरपंच वंदना प्रवीण भिलारे, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ जयु भाटकर, तसेच महाले कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

रक्कम महाले कुटुंबियांना देता आली याचे समाधान
साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले की, हिंदवी स्वराज्यासाठी लढणाऱ्या जिवा महाला यांच्या वंशाजांना हलाखीच्या परिस्थितीशी सामना करावे लागणे, ही बाब खेदजनक आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही महाले कुटुंबियांना शक्य ती मदत करत आलो असून प्रतीक्षाच्या शिक्षणाची जबाबदारीही आम्ही कर्तव्याच्या भावनेतून उचलली होती. आता तिचा विवाह होतो आहे आणि आता लता शिंदे यांच्या सुचवल्याप्रमाणे ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या माझ्या आगामी चरित्रग्रंथाच्या पूर्वनोंदणीतून जमा झालेली रक्कम महाले कुटुंबियांच्या लग्नकार्यासाठी देता आली याचे समाधान आहे, अशी भावना प्रदीप ढवळ यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -