Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र JJ Hospital : डॉ. लहाने यांच्यासह इतरांचे राजीनामे शासनाकडून मंजूर, मार्डच्या संघर्षाला...

JJ Hospital : डॉ. लहाने यांच्यासह इतरांचे राजीनामे शासनाकडून मंजूर, मार्डच्या संघर्षाला यश

Subscribe

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध अशा जे. जे. रुग्णालयातील डॉ. तात्याराव लहाने (Dr T P Lahane) आणि त्यांच्यासह 9 वरिष्ठ डॉक्टरांनी गुरुवारी (01 मे) तडफडकी दिलेले राजीनामे राज्य शासनाने मंजूर केले आहेत. आता त्यांच्या जागी लवकरच नवी नियुक्ती करण्यात येणार आहे.

जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख (Dr Ragini Parekh) आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून झालेल्या छळवणुकीविरोधात निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने संप पुकारला होता. याबाबत जे जे रुग्णालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 28 निवासी डॉक्टरांनी (JJ resident doctors) अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे मार्ड (MARD) संघटनेमार्फत तक्रार केली होती. त्याच्या आधारे डॉ. गजानन चव्हाण यांच्यासह अधिष्ठातांनी नेत्र विभाग प्रमुखांकडे स्पष्टीकरण मागितले. त्याच्याबरोबरीने डॉ. अशोक आनंद यांच्या अध्यक्षतेखील चौकशी समिती देखील नेमली.

- Advertisement -

महिला छळ प्रकरणी डॉ. रागिणी पारेख यांनी डॉ. अशोक आनंद यांची यापूर्वी चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. अभीचंदानी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीअंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली होती. सहा महिन्यांपूर्वी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्राम शिकवण्यासाठी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरून, आमचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरू ठेवण्यात आल्याचे सांगत डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ जणांनी राजीनामे दिले होते. यावरून मार्डने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना पत्रही लिहिले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. लहाने व इतरांचे राजीनामे शासनाने मंजूर केले.

आम्ही उद्विग्न झालो आहोत – डॉ. लहाने
डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्यासह 9 वरिष्ठ डॉक्टरांनी तडफडकी राजीनामे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी (02 जून) डॉ. तात्याराव लहाने आणि अन्य डॉक्टरांची पत्रकार परिषद झाली. आमची एकही बाजू न ऐकता जे विद्यार्थ्यांनी सांगितले ते ऐकून चौकशी झाली आणि आम्ही दोषी असल्याचे वर सांगण्यात आले, यामुळे आम्ही उद्विग्न झालो आहोत, असे सांगत डॉ. लहाने यांनी यापुढे माझा जे. जे. रुग्णालयाशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -