जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, कसा पाहता येणार निकाल?

जेईई मुख्य परीक्षेचा २०२२ सेशन १चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जाहीर करण्यात आला आहे. जेईई परीक्षेत पात्र होण्यासाठी खुल्या गटातील उमेदवारांना ७५ टक्के, एससी, एसटी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवावे लागतात. तसचे जेईई परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची यादी ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केली होती.

कसा पाहता येणार निकाल?

जेईई मुख्य सेशन १ चा निकाल jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. या संकेतस्थळावर JEE Main 2022 Session 1 Result अशी लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि माहिती भरून सबमिट करावी लागेल. त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

एनटीएने सेशन १ च्या परीक्षेचा निकाल जारी केल्यानंतर यामध्ये पात्र उमेदवार सेशन २ च्या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा झाल्यानंतर एनटीएकडून जेईई अॅडव्हान्स परीक्षेची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. जेईई मुख्य परीक्षा सेशन २ एनटीएकडून घेण्यात येणार असून ती २१ जुलै ते ३० जुलै २०२२ दरम्यान पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

खालील दिलेल्या वेबसाईटवर पहा जेईईचा निकाल –

jeemain.nta.nic.in

ntaresults.ac.in

nta.ac.in


हेही वाचा : लोबो आणि कामत यांच्यावर काँग्रेस करणार कारवाई, मुकुल वासनिक गोव्यात