पत्रकारितेमुळे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना नक्कीच वाचा फुटेल – केंद्रीय मंत्री नाईक

मंत्री नाईक यांच्या हस्ते शेतीनिष्ट पुरस्कार प्राप्त प्रकाश वालावलकर,प्रेस क्लब भुषण विश्वनाथ नाईक,जय भोसले यांना तर संदिप सावंत स्मृती पुरस्कार दिव्या वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला तर पद्मश्री परशुराम गंगावणे यांना ह्या निमित्ताने विशेष गौरविण्यात आले.

Journalism will definitely solve all the questions of the general public - Union Minister Naik
पत्रकारितेमुळे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना नक्कीच वाचा फुटेल - केंद्रीय मंत्री नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब’च्या वतीने पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता आव्हानात्मक असून,बाळशास्त्री जांभेकर यांचा आर्दश खऱ्या अर्थाने जपण्याचे काम हे जिल्ह्याने केले आहे सर्वाना न्याय देणाऱ्या पत्रकारिते मुळे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना नक्कीच वाचा फुटेल आणि हाच खरा आर्दश आहे,असे मत केंद्रीय आयुष तथा पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी माडलेते सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब च्या वतीने माडखोल येथील सावंत फार्म येथे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. मंत्री नाईक यांच्या हस्ते शेतीनिष्ट पुरस्कार प्राप्त प्रकाश वालावलकर, प्रेस क्लब भुषण विश्वनाथ नाईक,जय भोसले यांना तर संदिप सावंत स्मृती पुरस्कार दिव्या वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला तर पद्मश्री परशुराम गंगावणे यांना ह्या निमित्ताने विशेष गौरविण्यात आले.

यावेळी मंत्री यांनी सिंधुदुर्ग पत्रकारितेचे विशेष असे कौतुक करतना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला धरून येथील पत्रकारिता सुरू आहे.मी जिल्ह्यात आल्यानंतर प्रत्येक वेळी माझा पत्रकारांशी संवाद होत असतो त्यात त्याचा असलेला अभ्यास बघून मला नेहमीच अभिमान वाटत असतो सर्वानी एक ताकद निर्माण केली तर त्याचा विकास कामाला बळ मिळत असते सर्व सामान्य जनतेचे प्रश्न या निमित्ताने सुटत असतात असे मंत्री नाईक यांनी सांगितले.यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे,माजी आमदार राजन तेली,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसिलदार राजाराम म्हात्रे,पोलीस निरीक्षक शंकर कोरे,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,जिल्हाध्यक्ष उत्तम वाडकर,अनंत जाधव हेमंत खानोलकर उपस्थित होते.

पद्मश्री गंगावणे यांनी आपली व्यथा माडतना शेतकर्‍यांना कायम आधार ठरलेल्या जिल्ह्यातील बारा बलुतेदारांचा उतरत्या वयात राज्य व केंद्र शासनाने मानधन सुरू करुन सन्मान करावा,अशी मागणी गंगावणे यांनी केली. कलाकारांना देण्यात येणारे मानधन हे तुटपुंजे आहे. त्यामुळे ती रक्कम वाढविण्यासाठी शासनाकडुन प्रयत्न व्हावेत, असे ही ते म्हणाले.
तेली यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेचे कौतुक करतना येथील पत्रकार हा खरोखरच अन्यायाला वाचा फोडणारा असल्याचे नमूद केले तर प्रांताधिकारी पानवेकर यांनी ही पत्रकार करत असलेले काम बघून मला अभिमान वाटतो आजही वृत्तपत्राचे महत्त्व हे टिकून असल्याचे सांगितले तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी आपण अनेक जिल्ह्यात नोकरी केली तेथील पत्रकारिता बघितली आणि सावंतवाडीतील पत्रकारिता बघतो खरोखरच वेगळेपण आहे न्यायासाठी येथील पत्रकार झटतात असे म्हात्रे म्हणाले.बबन साळगावकर यांनी ही सावंतवाडीतील पत्रकारिता विकासाला दिशादायक असल्याचे सांगितले.यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या कोरोना परिस्थिती आढावा बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे अनुपस्थित, आरोग्यमंत्री टोपे राहणार हजर