घरताज्या घडामोडीज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे.

ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक अनंत दीक्षित यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वर्षाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

अनंत दीक्षित यांच्याविषयी

अनंत दीक्षित हे मूळचे सोलपूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी होते. त्यांच्या पत्रकारितेची खरी सुरुवात कोल्हापूरमधील सकाळ या वृत्तपत्रापासून झाली. ते बरेच वर्षे कोल्हापूर सकाळचे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते पुण्यात सकाळमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर ते काही वर्षे सकाळते मुख्य संपादक होते. त्यांनी जवळपास २० वर्षे सकाळमध्ये काम केले. दीक्षित यांचा रविवार सकाळ मध्ये गीतकार गुलजार यांच्याशी बोलून एक कॉलम लिहीत असत. त्यांचा हा कॉलम वाचकप्रिय झाला होता. त्यानंतर ते पुण्यातील लोकमत रुजू झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -