Homeमहाराष्ट्रकोकणNitesh Rane : व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी...पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काय...

Nitesh Rane : व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी…पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काय म्हणाले नितेश राणे

Subscribe

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राजकीय व्यक्ती आणि पत्रकार यांच्यात संवाद, समन्वय असायला हवा. अन्यथा गैरसमज निर्माण होऊन त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होईल. परिणामी जिल्ह्याचे नुकसान होईल. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी लिखाण करावे, असे आवाहन कणकवलीचे आमदार आणि मत्स्य तसेच बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केले.

तेजस्वी काळसेकर

सिंधुदुर्ग : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राजकीय व्यक्ती आणि पत्रकार यांच्यात संवाद, समन्वय असायला हवा. अन्यथा गैरसमज निर्माण होऊन त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होईल. परिणामी जिल्ह्याचे नुकसान होईल. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी लिखाण करावे, असे आवाहन कणकवलीचे आमदार आणि मत्स्य तसेच बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (journalists should work without personal hatred what did nitesh rane say in the program organized on the occasion of journalists day)

राजकीय नेते आणि समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकारांमध्ये समन्वय असावा, अन्यथा सी वर्ल्ड प्रकल्पासारखे अनेक प्रकल्प रखडतील. यापुढे जिल्ह्याच्या विकासाला महत्त्वाचा ठरणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील तरुणांना नोकरीसाठी जिल्हा सोडण्याची वेळ येणार नाही, याची ग्वाही आपण देत असल्याचे नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा – Baba Siddique Murder : मुंबईत दहशत कायम राहावी म्हणून…बाबा सिद्दिकींना मारण्याचे कारण आले समोर…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन येथे मराठी पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम झाला. पुढील वर्षापासून जिल्ह्यात एकच पत्रकार दिन साजरा होईल. पोंभुर्ले येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना मानाचे स्थान मिळेल. येथे कोणावरही अन्याय होणार नाही. यापुढे पोंभुर्ले गावाचे आणि स्थळाचे महत्त्व भविष्यात वाढेल. सिंधुदुर्ग विकासासाठी ही पाच वर्षे महत्त्वाची आहेत. कारण केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे स्थिर सरकार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एका विचाराचे आहेत. त्यामुळे या काळात विकास झाला नाहीतर लोक नाराज होतील. यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे मला सहकार्य हवे आहे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.

गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा विकासात मागे गेला आहे. हा बॅकलॉग भरून काढायचा आहे. जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते शोधण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी. जिल्ह्याच्या विकासाला केंद्रबिंदू मानून पत्रकारिता करावी. व्यक्तीला महत्त्व न देता विकासाला प्राधान्य देणारे लिखाण करावे, असे आवाहन यावेळी निलेश राणे यांनी केले.

हेही वाचा – CRZ Scam Mumbai : मुंबई किनारी मालमत्ता कायदेशीर करण्यासाठी 102 बनावट नकाशे; 18 कर्मचाऱ्यांची चौकशी

सिंधुदुर्गनगरी येथे असलेले पत्रकार भवन महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार भवन आहे. येथील डॉक्युमेंटेशन आणि ग्रंथ संपदा वाढविण्यासाठी आपण मदत करू. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी आणि इंग्रजीमधून दैनिक सुरू केले. त्यांच्या लिखाणामुळे १८५७ चा उठाव झाला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा वैचारिक पाया रचला होता. त्यांनीच जनतेच्या मनात पारतंत्र्याविरोधात भावना निर्माण केली. त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील तरुण कोण पुढे येत असल्यास आम्ही त्याला फेलोशिप मिळवून देऊ, त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रबंध प्रसिद्ध करू, असे प्रमुख वक्ते माधव भंडारी म्हणाले.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar