घरताज्या घडामोडीप्लेनमध्ये JRD Tata जेव्हा स्वतःच टॉयलेट पेपर बदलतात, अनुभवानंतर बोइंग विमानांची तपासणी

प्लेनमध्ये JRD Tata जेव्हा स्वतःच टॉयलेट पेपर बदलतात, अनुभवानंतर बोइंग विमानांची तपासणी

Subscribe

टाटा ग्रुपच्या सर्वात यशस्वी चेअरमन असलेल्या जेआरडी टाटा यांचा जन्म २९ जुलै १९०४ साली झाला होता. जेआरडी टाटा यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी म्हणजे १९३८ साली चेअरमनपद सांभाळले. त्यानंतर १९९१ पर्यंत एकुण ५३ वर्षे ते टाटा सन्सचे चेअरमन राहिले. देशातील उद्योगपतींमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळणाऱ्या उद्योगपतींमध्ये जेआरडी टाटा यांना १९९२ साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्या कालावधीत भारतरत्न मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीत उद्योग क्षेत्रात पहिल्यांदाच भारतरत्न मिळणाऱ्यांच्या यादीत जेआरडी टाटा हे पहिलेच होते. प्रवाशांना हवाई प्रवासा दरम्यानच्या उत्तम अनुभव मिळावा यासाठीचा जेआरडींचा कटाक्ष असायचा. जेआरडींकडून बोइंग फ्लाईटमध्ये टॉयलेट पेपर बदलल्याचा किस्सा गेल्या काही दिवसात चर्चेत आला होता. त्यांनी स्वतःला आलेल्या अनुभवानंतर सर्व टाटा एअर इंडिया बोइंग फ्लाईट्सची तपासणी केली होती.

फ्रांसमध्ये एव्हिशन क्षेत्राचे पाहिले स्वप्न

रतन दादाभाई टाटा आणि सुजैन ब्रियेर यांचे दुसरा पुत्र म्हणजे जेआरडी टाटा. भारतात पहिली कार चालवणारी महिला म्हणजे जेआरडी टाटा यांची आई होय. त्यांची आई फ्रांसीसी असल्यानेच त्यांचे लहाणपण हे फ्रांसमध्ये गेले होते. फ्रांसमध्येच त्यांना एअरक्राफ्टच्या क्षेत्रासाठीचे अधिक आकर्षण निर्माण झाले. त्यामुळेच वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी पायलट होण्याचा निश्चय केला. पण आपले पायलट बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांना ९ वर्षे वाट पहावी लागली. मुंबईत जेव्हा पहिल्या फ्लाईंग क्लबची स्थापना झाली तेव्हा जेआरटी टाटा हे २४ वर्षांचे झाले होते. १९२९ साली त्यांना पायलट म्हणून लायसन्स मिळाले. महत्वाचे म्हणजे भारतात पहिल्यांदा पायलट म्हणून परवाना देण्यात आला होता. त्यानंतर जेआरडी टाटा यांनी एव्हिएशन क्षेत्रातील पितामह म्हणून नाम कमावले.

- Advertisement -

भारतात मिळवल पहिल फ्लाईंग पायलटचे लायसन्स

भारतात पहिले फ्लाईंग लायसन्स मिळवणारे जेआरडी टाटा हे पहिलेच पायलट होते. त्यांनी १९३० मध्ये आगा खान पुरस्कारात सामील होण्यासाठी भारतातून इंग्लंड येथे त्यांनी हवाई दौरा केला. त्यानंतर दोन वर्षानंतर त्यांनी टाटा एअरलाईन्सची स्थापना केली. टाटा एअरलाईन्स ही भारतातील पहिली एअरलाईन्स होती. त्यानंतर सरकारने या एअरलाईन्सचा ताबा मिळवला. जेआरडी टाटा यांना १९३२ साली भारतातील पहिली कर्मशिअल फ्लाईट उडवण्याचा मान मिळाला. कराची येथून उडालेले विमान हे मुंबईत लॅण्ड झाले आणि भारतात पहिल्यांदाच हवाई सेवेला सुरूवात झाली. भारतात सध्या हवाई क्षेत्रासाठी सेवा देणाऱ्या एअर इंडिया सरकारी कंपनीचा ताबा मिळवण्यासाठीच्या स्पर्धेत अनेक स्पर्धकांपैकी एक स्पर्धक म्हणजे टाटा कंपनीदेखील आहे.

फ्लाईटच्या टॉयलेटमध्ये स्वतःच बदलला टॉयलेट पेपर

जेआरडी टाटा यांच्या आयुष्याशी संबंधित किश्शांपैकी एक किस्सा काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. जेआरडी टाटा जेव्हा एअर इंडियाने प्रवास करत होते तेव्हा त्यांच्या शेजारी आरबीआयचे माजी गव्हर्नर एल के झा बसले होते. अचानकपणे जेआरडी टाटा आपल्या सीटवरून उठले आणि एक तास झाल्यानंतरही आपल्या जागेवर आले नाही. पण एक तासानंतर जेव्हा ते पुन्हा आपल्या जागेवर आले तेव्हा एल के झा यांनी जेआरडींना विचारले की इतका वेळ कुठे होता ? तेव्हा जेआरडी टाटा म्हणाले की, टॉयलेट स्वच्छ आहे की नाही हे पहायला गेलो होतो. तेव्हा झा म्हणाले की या छोट्याश्या गोष्टीसाठी इतका वेळ ? तेव्हा जेआरडी टाटा म्हणाले की टॉयलेट पेपर व्यवस्थित लावण्यात आला नव्हता. हाच टॉयलेट पेपर नीट करत होतो. या फ्लाईटमधील अनुभवानंतर जेआरडी टाटा हे टाटा इंडियन एअरलाईन्सच्या प्रत्येक बोईंग विमानामध्ये पाहणीसाठी गेले. ज्याठिकाणी चुका आढळल्या त्याठिकाणी सर्व चुका सुधारल्या. एल के झा यांनी एकदा केलेल्या भाषणात सांगितले होते की, जेआरडी हे टाटा एअर इंडियाचे फक्त चेअरमन नव्हते, पण प्रवाशांची सुविधा सुधारण्यासाठी ते नेहमीच काळजी घ्यायचे. आपल्या प्रत्येक प्रवासानंतर एअरप्लेनमधील कर्मचाऱ्यांसाठी एक चिठ्ठी सोडून जायचे. त्यामध्ये मेन्टेनन्स आणि एअरलाईन्स स्टाफसाठी टिप्पणी असायची.

- Advertisement -

नव्या १४ कंपन्यांची सुरूवात

जेआरडी टाटा यांच्या कार्यकाळात टाटा ग्रुपची वृद्धी जवळपास ५० टक्क्यांनी झाली. त्यांच्या नेतृत्वात टाटा ग्रुपचे बाजार मूल्य १० कोटी डॉलरवरून ५०० कोटी डॉलरपर्यंत पोहचले. सद्यस्थितीला टाटा ग्रुपचे बाजारमूल्य हे २०० कोटी अरब डॉलर इतके आहे. त्यांच्या कार्यकाळात जवळपास नव्या १४ कंपन्यांची सुरूवात झाली. त्यामध्ये टाटा मोटर्स, टाटा सॉल्ट, टाटा ग्लोबल बेवरेजेस, टायटन यासारख्या यशस्वी कंपन्यांचा समावेश आहे. जेआरडी टाटा यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या अनुषंगाने टाटा प्रशासनिक सेवेची सुरूवात केली होती. या पुढाकाराचे उदिष्ट हे युवा वर्गात नेतृत्वगुण विकसित करणे हे होते. टाटांनी उद्योगासोबतच कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीचेही काम केले. त्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी ८ तासांची ड्युटी, मोफत वैद्यकीय सुविधा आणि भविष्य निधी योजनांचाही समावेश होता. कोणत्याही कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यास सर्वात आधी मोबदला देण्यासाठीची सुरूवात टाटा ग्रुपकडून झाली होती.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -