घरमहाराष्ट्र राज्यात महागुंतवणुकीचा ओघ सुरू, जेएसडब्ल्यू कंपनीचा ३५ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार

 राज्यात महागुंतवणुकीचा ओघ सुरू, जेएसडब्ल्यू कंपनीचा ३५ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार

Subscribe

कोरोना काळातही उद्योगचक्र सुरू ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून मंगळवारी नामांकित जेएसडब्ल्यू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५ हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

मंगळवारी झालेल्या करारांनुसार जेएसडब्ल्यू कंपनी जल आणि पवन ऊर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यावेळी उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन तसेच जेएसडब्ल्यूकंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रवीण पुरी आदी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेगावॅट क्षमतेचा जल विद्युत प्रकल्प सुरू केला जाणार आहे. भिवली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.

- Advertisement -

कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेचा पवन उर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. १ हजार ८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. आज झालेल्या दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -