घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहर्षल मोरेला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आज पुन्हा न्यायालयात हजर करणार

हर्षल मोरेला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आज पुन्हा न्यायालयात हजर करणार

Subscribe

नाशिक : बहुचर्चित द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सात मुलींचे लैंगिक शोषण करणारा संशयित आरोपी हर्षल मोरे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी मंगळवारी (दि.६) त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, त्याच्याविरुद्ध आणखी सहा गुन्हे दाखल असल्याने दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी पोलीस बुधवारी (दि.७) न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

म्हसरूळ शिवारातील मानेनगरमधील ज्ञानदीप आधार आश्रमात हर्षल मोरे याने २०१८ ते २३ नोव्हेंबर २०२२ या काळात मुलींचे लैंगिक शोषण केले. पोलिसांनी लैंगिक शोषण केलेल्या सात मुली व त्यांच्या पालकांचे जबाब घेतले असून, जबाब नोंदणी पूर्ण झाली आहे. पोलीस चौकशीदरम्यान द किंग फाउंडेशनच्या विश्वस्तांना कागदपत्रे सादर करता आली नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ज्ञानदीप आधार आश्रम ‘सील’ केला असून, सर्व विद्यार्थिनींना पालकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी सटाण्यातील मोरेच्या घरातून एअरगन जप्त केली आहे. ही गन पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवली आहे. शिवाय, सटाणा येथील मोरेच्या घरातील नातेवाइक व शेजारील नागरिकांचीही चौकशी केली. धर्मादाय आयुक्तांनी द किंग फाउंडेशनची मान्यता रद्द केली आहे. संशयित आरोपी हर्षल मोरेविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने दोनदा पोलीस कोठडी व मंगळवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आता दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी पोलीस बुधवारी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

ज्ञानदीप आधार आश्रमामध्ये मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या संशयित आरोपी हर्षल रामकृष्ण मोरे ऊर्फ सोनू सर यास न्यायालयाने पहिल्या गुन्ह्यात मंगळवारी (दि.६) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याच्याविरुद्ध आणखी सहा गुन्हे दाखल असल्याने गुन्ह्याच्या तपासाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. : सुधीर कोतवाल, सरकारी वकील

- Advertisement -
राष्ट्रीय बाल आयोगाचे सदस्य आज करणार पाहणी

त्र्यंबकेश्वर रोडवरील आधारतीर्थ आश्रमामध्ये चार वर्षीय चिमुकल्या खून आणि म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सात मुलींचे लैंगिक शोषणप्रकरणाची राज्य सरकारपाठोपाठ राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दखल घेतली आहे. या आयोगाचे सदस्य अनू चौधरी व हिमानी नौटियाल बुधवारी (दि.७) नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. ते आधारतीर्थ व ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाची पाहणी करणार आहेत. त्या पीडित मुलींशी संवाद साधणार आहेत. अनू चौधरी व हिमानी नौटियाल या बुधवारी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा बाल कल्याण अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांची भेट घेत माहिती घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -