घरमहाराष्ट्रफक्त 'या' तीन प्रश्नांची उत्तरे द्या, उदय सामंतांचे आदित्य ठाकरेंना आव्हान

फक्त ‘या’ तीन प्रश्नांची उत्तरे द्या, उदय सामंतांचे आदित्य ठाकरेंना आव्हान

Subscribe

मुंबई – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxcon Project) गुजरातला जावा याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अनिल अग्रवाल (Anil Agrawal) यांना भेटले, असा घणाघाती आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना तीन प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा – राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

- Advertisement -

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आमच्यामुळे राज्याबाहेर गेला असा आरोप होत असेल तर आदित्य ठाकरे यांनी मी विचारलेल्या तीन प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे. १. वेदांता हायपॉवरची कमिटीची मिटिंग का झाली नाही? २. १८ महिने कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग का झाली नाही? ३. एअरबससाठी डिफेन्सला लिहिलेलं एकतरी पत्र दाखवा.  असे प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केले आहेत.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक होता. मात्र, महाविकास आघाडीच्या काळातही एकही हायपॉवरची बैठक झाली नाही. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच १४ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पत्र लिहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्र लिहिले, असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ताईला सगळं माहितीय…; ‘त्या’ गुन्ह्याप्रकरणी आव्हाडांनी ट्वीटमधून नक्की कोणावर केले आरोप?

तसंच, आदित्य ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे या प्रकल्पासाठी डाओसला बैठक झाली. मग या बैठकीचे मिनिट्स कुठे आहेत, असा सवालही उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

या कोणत्याच प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. पण त्यांना सर्वांवर टीका टीप्पणी करायची आहे. महाराष्ट्रातील उद्योग विभागात आणि उद्योजकांमध्ये असं वातावरण तयार केलं की भविष्यात आपण महाराष्ट्राला बदनामा होऊ शकतो. सरकार वेगळं वागत असेल तर तुमच्या सूचना पाठवा. जरी आमचे पक्ष वेगळे असले, सत्ता वेगळी असली तरीही लोकशाहीसाठी उद्योग आणण्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करतो, असा संदेश आपण जगासमोर पोहोचूया. त्यामुळे सर्वपक्षांनी उद्योगासाठी एकत्र यायला पाहिजे, असंही आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे.

नाणारला विरोध म्हणून…

नाणारला १०० टक्के विरोध आहे. ज्याठिकाणी १०० टक्के विरोध आहे तिथे प्रकल्प करायचा नाही, असं आम्ही ठरवलं आहे. १२ जानेवारी २०२२ रोजी केंद्र सरकारला पत्र  पाठवण्यात आलं होतं. नाणार ऐवजी आम्ही बारसूला १३ हजार एकर जागा देऊ असं आश्वासन त्यावेळी करण्यात आलं होतं. आता तेव्हा कोणाचं सरकार होतं हे सांगणं उचित नाही. त्यामुळे रिफायनरीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी ठाकरे गटाला फटकारले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -