घरमहाराष्ट्रगरम तव्यावर फक्त ५ मिनिटं बसा; अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आव्हान मिळताच भोंदू...

गरम तव्यावर फक्त ५ मिनिटं बसा; अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आव्हान मिळताच भोंदू बाबा पसार

Subscribe

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मार्डी गावात गरम तव्यावर बसून एक भोंदू बाबा भक्तांना शिव्या देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आव्हान मिळताच हा बाबा पसार झाला आहे.

अमरावतीपासून १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मार्डी गावातील व्हायरल व्हिडिओमध्ये पेटत्या चुलीवर बसलेल्या बाबाच्या आजूबाजूच्या गावातील काही लोक जमले आहेत. पेटत्या चुलीवर बसल्याने गावातील लोकांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी बाबाचे नामकरण चुलीवरचा बाबा असे केले.

- Advertisement -

हेही वाचा – सदू आणि मधू भेटले असतील; मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे भेटीवर राऊतांचा टोला

या बाबाचे खरे नाव सुनील कावलकर असे असून हा बाबा स्वत:ला सच्चिदानंद गुरुदास महाराज असे म्हणवतो. हा बाबा पूर्वी मोलमजुरी करायचा, मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून त्याने स्वतःला बाबा म्हणून घोषित केले. आता तो पेटत्या चुलीवर बसून भक्तांना अर्वाच्या भाषेत शिव्याच्या रुपात आशीर्वाद देत असल्याचा बनाव केल्याचाही व्हिडिओ समाज माध्यमावर होत आहे.

- Advertisement -

आश्रमातील परिस्थिती आणि बाबा असलेला व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ पाहून बाबा म्हणतो की, माझा स्वतःचा अंधश्रद्धेवर विश्वास नाही. कारण मी संत गाडगेबाबांना मानणारा व्यक्ती आहे. माझे गोसेवेचे काम आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर टाकलेला व्हिडिओ लगेच काढा. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा भोंदू बाबा जगासमोर आला आणि व्हिडीओ बरीच चर्चा होताना पाहून तो मार्डी गावातून पसार झाला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आव्हान
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरीश केदार यांनी पेटत्या चुलीवर बसणाऱ्या बाबाला आव्हान केले आहे. बाबाने गरम तव्यावर फक्त पाच मिनिटे बसून दाखवावे आम्ही त्याला ३० लाख रुपये देऊ. बाबाने हे आव्हान स्वीकारल्यावर जर त्याला चटका बसला तर यासाठी तो स्वत: जबाबदार राहील असेदेखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा कट, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -