घरताज्या घडामोडीआधी भुंकायचे, आता थुंकताहेत, ज्योती वाघमारेंची राऊतांवर टीका

आधी भुंकायचे, आता थुंकताहेत, ज्योती वाघमारेंची राऊतांवर टीका

Subscribe

राज्याच्या राजकारणात विविध प्रकारचे शब्द समोर येत आहेत. अगदी पोपट ते कोंबड्यांचा खुराडा आणि शिव्यांपासून ते थेट थुंकण्यापर्यंत हे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर खासदार संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकले. त्याआधी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, उत्तरादाखल संजय राऊत थुंकले होते. त्यावरून आता शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी राऊतांवर टीका करत आधी भुंकायचे, आता थुंकताहेत असं म्हणत राऊतांवर निशाणा साधला आहे.

थुंकणं ही कुठली प्रवृत्ती आणि संस्कृती?

डॉ. ज्योती वाघमारे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून राऊतांवर टीका केली आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. संयमानं टीका करण्याची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रातील राजकारणाच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम दररोज संजय राऊत करत आहेत. खरंतर राजकारणात प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. ती नाही आली तर मान्य करावं लागतं. परंतु प्रश्नाला उत्तर देण्यासाठी थुंकणं ही कुठली यांची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे. हिच लोकं विचार, वारसा आणि इतर गोष्टींविषयी बोलत असतात. मग अशा थुंकीबहाद्दर प्रवक्त्यांना घेऊन ज्या पक्षप्रमुखाला राजकारण करायचं असेल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असं डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या.

- Advertisement -

जीभ वाकडी झाल्यामुळे ते थुंकताहेत

संजय राऊत याआधी दररोज सकाळी लाळघोटेपणाकरून आपल्या मालकाला खूश करण्यासाठी भुंकायचे. पण आता कदाचित डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ते आता थुंकू सुद्धा लागलेत. संजय राऊतांना वेड्यांच्या इस्पीतळात भरती करण्याची गरज आहे. सिल्व्हर ओकची आयुष्यभर थुंकी चाटत आणि या बोटाची थुंकी त्या बोटावर करत आयुष्य गेलेल्या राऊतांची शेपूट वाकडी असल्यामुळे ते भुंकायचे. मात्र, आता त्यांची जीभ वाकडी झाल्यामुळे ते थुंकताहेत, असं म्हणत वाघमारे यांनी राऊतांवर धारेवर धरलं.

पत्रकारांचा सुद्धा घोर अपमान

माझं संजय राऊतांना थेट आव्हान आहे की, जनतेतून निवडून आलेल्या एका खासदाराबद्दल जर तुम्ही उत्तर देताना थुंकत असाल, तर आमच्या आमदारांच्या मतदारांवरती मिळालेली खासदारकी सोडा. जनतेतून निवडणुकीला उभं राहा. मग बघा मतदानाच्या माध्यमातून ही जनता तुमच्या तोंडावर कशी थुंकते. माईक हे पत्रकारितेचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. एका मराठी पत्रकाराच्या प्रश्नावर थुंकणारे आणि माईकवर थुंकणाऱ्या संजय राऊतांनी पत्रकारांचा सुद्धा घोर अपमान केला आहे, असंही वाघमारे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : Sanjay Raut : कधी शिवी तर कधी थुंकणे… पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्यांवर संजय राऊत यांचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -