घरमहाराष्ट्रएकनाथ खडसेंनी केलेल्या खोक्यांच्या उल्लेखावरून केसरकर संतापले, दिले आव्हान

एकनाथ खडसेंनी केलेल्या खोक्यांच्या उल्लेखावरून केसरकर संतापले, दिले आव्हान

Subscribe

मुंबई – सरपंचांच्या थेट निवडीच्या विधेयकावर विधान परिषदेत चर्चा सुरू होती. यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाला मुख्यमंत्री पदावरून डिवचले. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एकनाथ खडसे याना उत्तर दिले.

खडसे काय म्हणाले –

- Advertisement -

ग्रामपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत घोडेबाजार होतो. तर मग मुख्यमंत्री निवडीत घोडेबाजार होता का बैल बाजार होता. खोके खोके दिले ओके ओके झाले हे खरे आहे की खोटे हे मला माहीत नाही. मीडियाच्या हवाला देऊन सांगतो. इलेक्ट्रानी मिडीयावर एका सन्माननीय आमदाराचे सांगीतले की बघा मला ऑफर आली अॅब्युलंस मधून पैसे भरून आणले,असे एकनाथ खडसे म्हणाले.

मंत्री दीपक केसरकर काय म्हणाले –

- Advertisement -

सभागृहात विषय आला म्हणून सांगतो 5 खोके सोडा 5 रुपये जरी दिले असले तरी राजीनामा देईन. आम्ही आमच्या तत्वांसाठी भांडलो आहोत. तत्वांसाठी भांडने आमि त्यासाठी एखाद्याला चिडवणे, भले सत्ता गेली आहे. एखाद्याची सत्ता गेली त्या वाईट वाटणारच. मात्र, वाईट वाटताना एखाद्याला किती बदनाम करावे याला मर्यादा आसते. आपण पायऱ्यावर बसला मी कधी ऑब्जेक्शन घेतले नाही. मी सुद्धा प्रवक्ता आहे. स्टेटमेंट करून शकलो असतो पण मी केले नाही. सभागृहात बोलल्यावर नोंद होते. चूकीची नोंद होऊनये. आपल्या बद्दल मला अतीशय आदर आहे. आपण आपल्या तत्वांसाठी पक्ष सोडला होता. असे दीपक केसरकर म्हणाले

खडसेंचे स्पष्टीकरण – 

मी तुमच्या सदस्याचे नाव घेतलेले नाही. मिडीयाला सांगा तुम्ही खोटे दाखवले. तुम्ही लगेच खुलासा द्यायला पाहीजे हा आमचा आमदार नाही. तो चूकीची माहिती देतोयशंभुराजे किंवा इतर कोणी मंत्र्यांनी म्हटले हो तुम्हाला ही पाहीजे का. आम्ही घेतले तुम्हाला पाहीजेत का असाल याचा दुसरा अर्थ होतो, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -