Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "महाराष्ट्रातील राजकारणात कबड्डी सुरू", जितेंद्र आव्हाडांची सरकारवर निशाणा

“महाराष्ट्रातील राजकारणात कबड्डी सुरू”, जितेंद्र आव्हाडांची सरकारवर निशाणा

Subscribe

ठाणे : “महाराष्ट्रातील राजकारणात कबड्डी सुरू आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारसह मंत्र्यांवर केली आहे. लाखो तरुणांच्या आयुष्यासोबत खेळखंडोबा सुरू आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी तलाठी भरती परीक्षेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

तलाठी भरती परीक्षेसंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “लाखो तरुणांच्या आयुष्यासोबत खेळखंडोबा करताय. राज्य सरकारला कोणत्याही गोष्टींचे गांभीर्य राहिलेले नाही. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, याचे मंत्री पद जायते का?, त्यांचे मंत्री पद जाते का?, याला मुख्यमंत्री पदावरून काढताय का?, त्याला मुख्यमंत्री पद बसवितात का?, यात सर्व मंत्री रमलेले आहेत. तो मुख्यमंत्री होणार असेल, तर त्यांच्या ऑफिसबाहेर अधिकारी बसलेले असतात. हा मुख्यमंत्री होणार नाही, म्हणून येथून निघालेले असतात. महाराष्ट्रात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची कबड्डी झालेली आहे. तिघांमध्यो खो-खो, कबड्डीचे खेळ चालू आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – Mhada recruitment 2021 : पुढच्या परीक्षेची जबाबदारी म्हाडा घेणार – जितेंद्र आव्हाड

आव्हाडांच्या काळात म्हाडा भरती पेपर फुटले  

जितेंद्र आव्हाडा हे तलाठी भरतीवरून राज्य सरकारवर टीका केली. पण, महाविकास आघाडीच्या काळात गृहनिर्माण मंत्री असताना म्हाडा भरती पेपर फुटले होते. त्यावेळी म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरण चांगलेच तापले होते. तेव्हाचे तत्कालीन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. पण, आता फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तर जितेंद्र आव्हाड हे विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Mhada पेपर फुटी प्रकरणी CBI चौकशी गरजेची, फडणवीसांची मागणी

गावितांच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले…

विजय कुमार गावित भाषणात म्हणाले, मासे खाल्ल्याने डोळे सुंदर होतात, या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी आजपासून मासे खाण्यास सुरुवात करतोय. गावितांनी नवीन शोध लावलाय, गावित हे डॉक्टर आहेत ना, ते त्यांनी काही नवीन शोध लावला आहे. गावितांनी अभ्यास वर्ग घ्यावेत, मुले येतील, पोरी कसा पटवावा, असा त्यांचा सल्ला आहे. मंत्री आहेत चांगले सल्ले देतात.”

- Advertisment -