Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

Kalicharan Maharaj granted bail by Pune Court
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजला २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला पुणे कोर्टाने २५ हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन दिला आहे. पुण्याच्या कोर्टाने कालीचरण महाराजला एक दिवसासाठी पोलीस कोठडी सुनावली होती. पहिल्यांदा रायपूरमध्ये कालीचरण महाराजला महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक केली होती आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. परंतु पुणे कोर्टाने दुसऱ्या प्रकरणात पोलीस कोठडीत पाठवले होते.

सोमवारी महाराष्ट्र पोलिसांनी रायपूर कोर्टात ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज केला होता, मात्र पोलिसांची ही मागणी फेटाळण्यात आली. यानंतर पोलिसांनी मंगळवारी पुन्हा न्यायालयात अर्ज केला, जो कोर्टाने मान्य केला. दरम्यान कालीचरण महाराज विरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रायपूर येथील धर्मसभेत कालीचरण महाराजने महात्मा गांधीजींना शिवीगाळ करत अपशब्द वापरले होते. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेपासून देशभरात उमटले. त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. असे असतानाही कालीचरण महाराजाने आपली वादग्रस्त विधाने सुरुच ठेवली. व्हिडिओच्या माध्यमातून त्याने पुन्हा एकदा महात्मा गांधींविरोधात बरळ ओकली. त्यामुळे छत्तीसगड पोलीस मागील काही दिवसांपासून कालीचरण महाराजाच्या मागावर होते. अखेर खजुरोही येथील बागेश्वर धाम येथील घरातून कालीचरण महाराजाला बेड्या ठोकल्या होत्या. २६ डिसेंबर रोजी रायपूरमधील टिकरापारा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत कलम ५०५(२) (शत्रुत्व, द्वेष किंवा दुर्भावना निर्माण करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणारी विधाने) आणि २९४ (अश्लील कृत्ये) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कलम १२४ (ए) (देशद्रोह) आणि आयपीसीची इतर चार कलमे जोडली.


हेही वाचा – Malvani ISIS Case: मालवणी ISIS प्रकरणातील दोन्ही आरोपींना NIA कोर्टाने ८ वर्षांची ठोठावली शिक्षा; १० हजार भरावा लागणार दंड