घरताज्या घडामोडीफेरीवाला तर निमित्त, हल्ला सूड भावनेतूनच; कल्पिता पिंपळेंचा धक्कादायक दावा

फेरीवाला तर निमित्त, हल्ला सूड भावनेतूनच; कल्पिता पिंपळेंचा धक्कादायक दावा

Subscribe

आम्ही अनधिकृत कामांवर कारवाई केली आहे. या अनधिकृत कामांच्या कारवाईला ब्रेक लागावा यासाठी हे कारस्थान करण्यात आलं आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ठाण्यातील कासारवडवली येथील फेरिवाल्याने कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची दोन बोटं तुटली होती त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या सुरक्षा रक्षकाचे एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळेंवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. घरी परताना कल्पिता पिंपळेंनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. माझ्यावर करण्यात आलेला हल्ला सूड भावनेने करण्यात आला आहे. फेरिवाला एवढा आक्रमक होत नाही. अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यामुळे हा हल्ला करण्यात आला असल्याचा दावा कल्पिता पिंपळे यांनी केला आहे.

कल्पिता पिंपळे यांनी रुग्णालयातू बाहेर पडताना माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पिंपळे यांनी सर्वांचे आभार मानले असून माझ्यावर फेरिवाल्यांवर कारवाई केल्यामुळे हल्ला करण्यात अल्याचे सगळ्यांना वाटत आहे. मात्र माझ्यावर फेरिवाल्याने हल्ला केला असला तरी हा हल्ला सूड भावनेतून करण्यात आला आहे. आमच्या ज्या बदल्या करण्यात आल्या आणि आम्ही अनधिकृत कामे तोडायला सुरुवात केली. ठाण्यातील अनधिकृत इमारतींवर कारवी केली त्यानंतर धाब्यांवर कारवाई केली. जर फेरिवाल्यांना त्यांचा निषेध नोंदवायचा असता तर त्यांनी घटना घडल्यानंतर तात्काळ प्रतिक्रिया दिली असती. मी गाडीतून उतरल्यानंतर पाच -चार मिनिटांनी हा हल्ला झाला आहे. यामगे फेरीवाला हे वाटत नाही असे कल्पिता पिंपळे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सूड भावनेतून हल्ला

आम्ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यामुळे ही कारवाई कुठेतरी थांबायला हवी यासाठी हा हल्ला केला असल्याचा दावा कल्पिता पिंपळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, तुम्हाला न्याय मिळेल त्यामुळे नक्कीच मला न्याय मिळेल. आम्ही कारवाई करु आणि आम्ही कारवाई करण्यासाठीच आहोत. आज माझे वैयक्तिक नुकसान झालं आहे. जर मी माझा जीव गमावला असता तर माझा मुलगा अनाथ झाला असता, माझ्या कुटुंबीयांना मी मिळाली नसती याचा विचार कुणी करत नाही. हा हल्ला फेरिवाल्यांचा नाही मी जी कारवाई करत होती त्या कारवाईला हा विरोध करण्यात आला आहे. यामुळे हे सूडभावनेतून केलेलं कृत्य आहे. यामुळे मी या हल्ल्याला घाबरत नाही. आम्ही आणखी जोमाने येऊ आणि आमचे काम करु असा इशारा कल्पिता पिंपळे यांनी हल्लेखोरांना दिला आहे.

फेरिवाला आक्रमक होत नाही

मी या क्षेत्रात गेली ११ वर्ष काम करत आहे. अनेक फेरिवाल्यांवर कारवाई केली आहे. फेरिवाला कधीच आक्रमक होत नाही. यामुळे यामागे वेगळं कारण आहे. आम्ही अनधिकृत कामांवर कारवाई केली आहे. या अनधिकृत कामांच्या कारवाईला ब्रेक लागावा यासाठी हे कारस्थान करण्यात आलं आहे. परंतु मी कामावर पुन्हा रुजू झाल्यानंतर पुन्हा आक्रमकतेने कारवाई करु असे कल्पिता पिंपळे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -