घर क्राइम Kalyan Crime: महिला कॉन्टेबलला गुंगीचं औषधं पाजून जवानाने केला बलात्कार

Kalyan Crime: महिला कॉन्टेबलला गुंगीचं औषधं पाजून जवानाने केला बलात्कार

Subscribe

आर्मीत जवान असलेल्या एका 28 वर्षीय तरुणाशी पीडित महिला कॉन्स्टेबलची इंस्टाग्रामवर ओळख होऊन दोघात प्रेम जुळलं होतं. मात्र, त्यानंतर संधीचा फायदा घेत आर्मीत जवान असलेल्या प्रियकराने महिला कॉन्स्टेबल प्रयेसीला गुंगीकारक थंड पेय पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कल्याणमधील 30 वर्षीय कॉन्स्टेबलवर बीडमधील एका आर्मी जवानाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आर्मीत जवान असलेल्या एका 28 वर्षीय तरुणाशी पीडित महिला कॉन्स्टेबलची इंस्टाग्रामवर ओळख होऊन दोघात प्रेम जुळलं होतं. मात्र, त्यानंतर संधीचा फायदा घेत आर्मीत जवान असलेल्या प्रियकराने महिला कॉन्स्टेबल प्रयेसीला गुंगीकारक थंड पेय पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ( Kalyan Crime A woman constable was raped by a Army jawan )

याप्रकरणी आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आर्मीत जवान असलेल्या प्रियकरावर अत्याचारासह विविध कलमांनुसार पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश घुले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव असून तो सध्या पुणे जिल्ह्यातील आर्मी कार्यालयात जवान म्हणून कार्यरत आहे.

- Advertisement -

तर, पीडित महिला कॉन्स्टेबल कल्याण पूर्वेत कुटूंबासह राहत असून ती मुंबई दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तर आरोपी आकाश हा कल्याण पश्चिम भागात राहत असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

पीडित महिला कॉन्स्टेबल हिची 2021साली इंस्टाग्रामवर आरोपी आकाशची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांत मैत्री होऊन आरोपीने आपण आर्मीत जवान असून तू कशी दिसते तुला मला बघायचं आहे, असं बोलून प्रेमाच्या जाळ्यात पीडितेला अडकवले. त्यानंतर वर्षभर दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळल्याने त्यांचे सतत मोबईलवर बोलणं सुरु होतं. त्यातच मे 2022 मध्ये आरोपी प्रियकर आकाश हा पीडितेच्या कल्याण पूर्वेतील घरी आला होता. त्यावेळी रात्रीच्या सुमारास पीडितेला गुंगीकारक थंड पेय पाजून तिच्यावर बलात्कार केला. मात्र, बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीने प्रेमाच्या आणा भाका देऊन लग्न करण्याचे आमिष दाखवत पीडितेला शांत केले. त्यानंतर मात्र लग्नाचं आमिष दाखवून पीडितेबरोबर वर्षभर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

- Advertisement -

( हेही वाचा: Loksabha election : महायुतीत कुरबुर; शिंदे गटाने 22 जागांवर दावा केल्यानं भाजप नाराज? )

एकदा विवस्त्र होऊन त्याने तिला व्हिडीओ कॉलही करायला लावला. तसं केलं नाही तर मी दुसऱ्या मुलीशी लग्न करेन अशी धमकी त्यानं दिली. त्यानंतर पीडित तरुणीने आरोपी प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, त्यावेळी पीडितेला जातीचे कारण देत आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडितेने बीड जिल्ह्यातील पोलीस स्थानकात धाव घेतली आणि आरोपी जवानाविरुद्ध तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्ररीवरुन पोलिसांनी आरोपी आकाशवर 376 (2) एन, 328 तसचं अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार, गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

- Advertisment -